रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय, तेर
रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे असलेले ऐतिहासिक संग्रहालय आहे. या संग्रहालयात तेर गावचे रहिवासी रामलिंगअप्पा खंडप्पा लामतुरे व त्यांचे चिरंजीव भागवतप्पा रामलिंगअप्पा लामतुरे यांनी संग्रहीत केलेल्या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. इ.स. १९६१ साली रामलिंगअप्पा लामतुरे यांनी हा संग्रह शासनाला देऊ केला आणि इ.स. १९६७ साली महाराष्ट्र शासनाने हा संग्रह घेण्याचा निर्णय घेतला आणि २२ जानेवारी, इ.स. १९७१ रोजी लामतुरे यांनी हा संग्रह शासनाकडे सुपूर्द केला.[१]
दालने
[संपादन]रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालयात एकूण तीन दालने असून या दालनात जवळपास पंचवीस हजार वस्तू मांडलेल्या आहेत. यामध्ये मातीच्या वस्तू, खापरे, मणी, दगडांच्या मूर्ती, शाडूच्या मुर्ती, हस्तिदंतावर कलाकुसर केलेल्या वस्तू, शंखांच्या वस्तू, हाडांच्या वस्तू तसेच वेगवेगळ्या स्त्री प्रतिमा मांडलेल्या आहेत. याव्यतिरीक्त सातवाहन आणि इतर राजघराण्यांची नाणी, नाण्यांच्या मातीच्या केलेल्या प्रतिकृती आणि नाण्यांचे साचेही आहेत. या वस्तुसंग्रहालयात अनेक प्रकारच्या वस्तू असून सर्वात जास्त वस्तू या साच्यात बनविलेल्या मातीच्या मूर्ती आहेत.
वस्तू
[संपादन]हस्तिदंताच्या वस्तू
[संपादन]लामतुरे संग्रहालयात हस्तिदंताच्या स्त्रीमूर्ती आहेत. या मूर्ती आरशाच्या मुठी म्हणून वापरल्या जात. स्त्रीमूर्तीच्या माथ्यावर छिद्र असून त्यात चकचकीत तांब्याच्या पत्र्याच्या आरशाचे दांडे अडकवले जात.
संदर्भ
[संपादन]- ^ "तेरचे वस्तुसंग्रहालय". १५ फेब्रुवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)