कोनी २०१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोनी २०१२
दिग्दर्शन जेसन रसेल
भाषा इंग्लिश
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
संकेतस्थळ [पूर्ण लघुपट - यूट्यूब अधिकृत संकेतस्थळ]


कोनी २०१२ ही एक मोहीम आहे , त्या साथी "इनविसिबल चिल्ड्रेन" या संस्थेने तयार केलेला हा एक लघुपट आहे. लघुपटाचा मुख्य उद्देश हा युगांडा मधील क्रूरकर्मा जोसेफ कोनी यास अटक करणे असा आहे. २०१२ म्हणजे २० प्रसिद्ध व्यक्ति व १२ नेते यांना कोनी बद्दल जागरूक करणे म्हणून "२०१२" हे जोडण्यात आले आहे. या चित्रपटाचा प्रसार वणव्यासारखा झाला, व दहा दिवसात ५ करोड लोकांनी हा लघुपट यू ट्यूब वर पाहिला. बिल गेट्स , रिहाना इत्यादी प्रसिद्ध व्यक्तींनी या चित्रपट रूपी मोहिमेस उघड पाठिंबा दिला आहे. मोहिमेचा भाग म्हणून संस्था अमेरिकेत सर्व ठिकाणी "कोनी २०१२" अशी पोस्टर्स चिकटवण्यास आली आहेत. तसेच कोनीला थांबण्यासाठी तो आधी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून त्याला प्रसिद्ध करणे गरजेचे आहे या तत्त्वावर मोहिमेची आखणी करण्यात आली.

सारांश[संपादन]

या लघुपटात युगांडा मधील लहान मुलांचे कश्या प्रकारे शोषण होते व त्यांच्या हाती राष्ट्र देऊन स्वतःच्याच परिवाराला संपवले जाते हे दाखवले आहे. जोसेफ कोनी हा युगांडा मधील मुला-मुलींचे अपहरण करून त्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण देतो, व सहकाऱ्य न करणाऱ्या मुलांचे चेहरे खराब करतो, ते थांबण्यासाठीचे "इनविसिबल चिल्ड्रेन" संस्थेचे प्रयत्न या चित्रपटात अधोरेखित केले आहेत.

बाह्य दुवे[संपादन]