हसन रूहानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हसन रूहानी

इराणचे राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
३ ऑगस्ट, इ.स. २०१३
सर्वोच्च पुढारी अली खामेनेई
मागील महमूद अहमदिनेजाद

जन्म १२ नोव्हेंबर, १९४८ (1948-11-12) (वय: ७५)
सोर्केह, सेन्मान प्रांत, इराण
धर्म शिया इस्लाम

हसन रूहानी (फारसी: ‌حسن روحانی‎ ; रोमन लिपी: Hassan Rouhani, १२ नोव्हेंबर १९४८) हे इराणचे ७वे व विद्यमान राष्ट्राध्यक्ष, तसेच वकील, विद्वान व माजी मुत्सद्दी आहेत. जून, इ.स. २०१३ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये तेहरानाचे महापौर मोहम्मद बाकर गालिबाफ यांना व अन्य चार प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत राष्ट्राध्यक्ष म्हणून हे निवडून आले. ३ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. याआधी हे इ.स. १९८९पासून सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य म्हणून, तर इ.स. १९९२पासून इराणमधील व्यूहनीती संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून काम करत होते. यांनी इराणच्या ४थ्या व ५व्या संसदेचे उपसभापतिपद सांभाळले; तसेच इ.स. १९८९-२००५ या कालखंडात सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिवपदही सांभाळले. सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून यांनी युरो तीन राष्ट्रांशी - अर्थात युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी या युरोपीय संघातील तीन बड्या राष्ट्रांशी - इराणच्या आण्विक कार्यक्रमासंदर्भात वाटाघाटी करणाऱ्या इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • "अधिकृत अध्यक्षीय संकेतस्थळ" (फारसी, अरबी, उर्दू, इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, and जर्मन भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "अधिकृत वैयक्तिक संकेतस्थळ" (फारसी भाषेत). Archived from the original on 2013-06-08. 2013-06-16 रोजी पाहिले.