मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे २६ ,वे साहित्य संमेलन दिनांक ६, ७ व ८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान बीड येथे संपन्न झाले. साहित्यिक पौलस वाघमारे हे संंमेलनाचे अध्यक्ष होते तर बीड येथील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे आशिष शिंदे स्वागताध्यक्ष होते. तीन दिवसीय संमेलनात परिसंवाद, चर्चिसत्रे, कथाकथन, कविसंमेलन, खुले अधिवेशन आदी उपक्रम उत्साहाने पार पडले.

२३वे अधिवेशन १०-११-१२ मे २०१२, या दिवसांत अहमदनगर येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष अशोक आंग्रे होते. हे साहित्य संमेलन, इसवी सन १८४२ च्या जून महिन्यापासून अहमदनगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या, आणि आजतागायत गेली १७० वर्षे अव्याहतपणे चालू असणाऱ्या ज्ञानोदय नियतकालिकातर्फे आयोजित केले जाते.

पहिल्या २३ संमेलनांपैकी आतापावेतो १६ प्रॉटेस्टंटपंथीय ख्रिस्ती लेखकांनी तर केवळ सात कॅथोलिकपंथीय लेखकांनी या साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. काही वर्षांपूर्वी ही अध्यक्षपदे दोन्ही पंथातील लेखकांनी आलटून पालटून वाटून घ्यावीत असा अलिखित समझोता झाला होता.

आतापर्यंत महाराष्ट्रातील नाशिक, निपाणी, अहमदनगर, पुणे, बारामती, सोलापूर, मुंबई, मालवण, जालना, नागपूर या विविध ठिकाणी ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलने भरली. त्यांतील बहुतांशी द्विदिवसीय होती. अध्यक्षस्थानी फादर फ्रान्सिस दिब्रिटो, निरंजन उजगरे, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. अनुपमा उजगरे, डॉ. सुभाष पाटील वगैरे साहित्यिक होते.

यापूर्वीची मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने आणि त्यांचे अध्यक्ष
  • १ले : १८-१९एप्रिल १९२७, अहमदनगर, रेव्हरंड डॉ. निकल मेकॅनिकल
  • २रे : १८-१९ एप्रिल १९३०, मुंबई, मनोहर कृष्ण उजगरे (स्वागताध्यक्षा लक्ष्मीबाई टिळक)
  • ३रे : २८-२९ डिसेंबर १९३२, निपाणी, देवदत्त नारायण टिळक
  • ४थे : २८-२९ डिसेंबर १९३३, नागपूर, लक्ष्मीबाई नारायण टिळक (स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद साळवे)
  • ५वे : १५-१७ ऑक्टोबर १९५४, केडगाव, पु.ल.पाटोळे
  • ६वे : १८-१९ नोव्हेंबर १९५५, पुणे, रेव्ह. सुमंत धोंडो रामटेके
  • ७वे : २७-२९ डिसेंबर १९५६, पुणतांबे, वसंत भाऊराव समुद्रे
  • ८वे : ६-७ नोव्हेंबर १९७२, पुणे, आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी (स्वागताध्यक्ष आचार्य दीनानाथ एस.पाठक)
  • ९वे : २९-३० डिसेंबर १९७३, मुंबई, फादर डॉमनिक ऑब्रिओ (स्वागताध्यक्ष हरिश्चंद्र भास्कर उजगरे)
  • १०वे : ३-४-नोव्हेंबर १९७५, बारामती, भास्करराव जाधव (स्वागताध्यक्ष डॉ. कमलाकर कोल्हटकर)
  • ११वे : २७-२८डिसेंबर १९७७, सोलापूर, रॉक कार्व्हालो (स्वागताध्यक्षा मरियम रॉजर्स)
  • १२वे : २३-२४ मे १९८१, अहमदनगर, श्रीमती रामकुंवर नामदेव सूर्यवंशी (स्वागताध्यक्ष डॉ.एस.के. हळबे)
  • १३वे : २९-३० डिसेंबर १९८४, मुंबई, फादर डॉ. एलायस रॉड्रिग्ज (स्वागताध्यक्षा विजया शामराव पुणेकर)
  • १४वे : २८-२९ एप्रिल १९९०, मुंबई, विजया शामराव पुणेकर (स्वागताध्यक्ष रवि देवीप्रसाद शर्मा)
  • १५वे : १०-१२ जानेवारी १९९२, पुणे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो (स्वागताध्यक्ष फादर नेल्सन मच्याडो)
  • १६वे : १७-१८ डिसेंबर १९९४, मालवण, निरंजन हरिश्चंद्र उजगरे (स्वागताध्यक्ष फादर डिसिल्व्हा)
  • १७वे : १८-१९ एप्रिल १९९८, नागपूर, प्रा. सुधीर देवीप्रसाद शर्मा (स्वागताध्यक्ष बिशप रा. रेव्ह. विनोद पीटर)
  • १८वे : ५-६ फेब्रुवारी २०००, नाशिक, प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो (स्वागताध्यक्ष फादर ज्यो पिठेकर)
  • १९वे : १५-१७ नोव्हेंबर २००१, अहमदनगर, प्राचार्य देवदत्त हुसळे (स्वागताध्यक्ष कमलाकर देठे)
  • २०वे : २७-२९ मे २००५, मुंबई, डॉ. अनुपमा निरंजन उजगरे (स्वागताध्यक्ष विलास तोरणे)
  • २१वे : १८-२० मे २००७, जालना, डॉ.सुभाष कृष्णराव पाटील (स्वागताध्यक्ष विवेक निर्मल)
  • २२वे : ८-९-१० मे २००९, वसई, अध्यक्ष फादर मायकेल (स्वागताध्यक्ष
  • २३वे : १०-१२ मे २०१२, अहमदनगर, अशोक आंग्रे (स्वागताध्यक्ष रेव्ह. प्रदीप कांबळे)
  • २४वे :
  • २५वे : २०-२२ नोव्हेंबर २०१४, सोलापूर, डॉ. नाझरथ मिस्किटा (स्वागताध्यक्ष मोहन आंग्रे)