Jump to content

अनुपमा उजगरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अनुपमा निरंजन उजगरे या पानावरून पुनर्निर्देशित)
अनुपमा उजगरे
जन्म नाव अनुपमा निरंजन उजगरे
जन्म अहमदनगर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्यलेखन, काव्य, संपादन, वैचारिक लिखाण
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र
प्रसिद्ध साहित्यकृती परकीय ख्रिस्ती मिशनऱ्यांचे मराठी भाषाविषयक कार्य
पती निरंजन हरिश्चंद्र उजगरे
अपत्ये रणजित (पुत्र)

डॉ. अनुपमा निरंजन उजगरे या मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. शिक्षण एम्, ए., बी.एड्., पीएच्.डी. सध्याचे वास्तव्य : ठाणे(पश्चिम), महाराष्ट्र. त्यांचे पती निरंजन हरिश्चंद्र, सासरे हरिश्चंद्र भास्कर आणि आजेसासरे रेव्हरन्ड भास्कर कृष्ण उजगरे, हेही साहित्यिक होते. अनुपमा उजगरे यांनी कथा, कविता, ललित आणि संशोधनपर लेखन केले आहे.

अनुपमा उजगरे यांचे दिवंगत पती निरंजन उजगरे यांनी ‘सोविएत भावकविता’, ‘हिरोशिमाच्या कविता’, आणि ’भारतीय भाषांच्या कवितांचा मराठी अनुवाद’ असे अनुवादित कवितांचे मोठे दालन मराठी वाचकांसाठी यापूर्वीच खुले केले होते. पतीचा हा वारसा अनुपमा उजगरे यांनी समर्थपणे चालवला आहे. त्याचा प्रत्यय ‘सीमेवरून’ या कवितांच्या अनुवादातून येतो.

डॉ. अनुपमा निरंजन उजगरे या, २००५ साली मुबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. प्रसिद्ध कवयित्री असल्याने त्यांचा ठाणे-मुलुंड परिसरातील अनेक कविसंमेलनांत सहभाग असतो. काही कविसंमेलने अशी : (१)कविसंमेलन , ठाणे २-१-२००९ (२) रुईया कॉलेज माटुंगा येथील नोव्हेंबर २००९ची काव्यसंध्या (३) १-१२-२०१० ठाणे (४) ४-६ डिसेंबर २०११ ठाणे येथील ग्रंथोत्सवात सहभाग (५) महिलादिनानिमित्त कविसंमेलन १४-३-२०१२ ठाणे, अध्य्क्षपद (६) ठाणे येथील उमा नीलकंठ मैदानात झालेले कविसंमेलन १-१२-२०१० वगैरे.

अनुपमा उजगरे यांनी अनेक कवीच्या कवितासंग्रहांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या आहेत.

अनुपमा उजगरे यांचे प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • इथे ओशाळला विधाता (शैलजा बेडेकर यांचे चरित्र)(इ.स.२००६)
  • काळोखातील कवडसे (अनेक कवीच्या कवितांचा संपादित संग्रह, सहसंपादक - निरंजन उजगरे)
  • काळोखातील तिरीप (अनेक लेखकांच्या लेखांचा संपादित संग्रह, सहसंपादक - निरंजन उजगरे)
  • खाद्यसंस्कृतिविषयक मराठी वाक्‌प्रचार व म्हणी
  • चांदणचुरा (ललित लेख संग्रह) या पुस्तकाला खानदेशकन्या स्मिता पाटील पुरस्कार (२००९) मिळाला आहे.
  • जाण (कथासंग्रह)
  • तुम्हाला काय वाटते?(वैचारिक लेखसंग्रह)
  • तू बोलाविले सेवा कराया (डॉ. रत्नाकर साळवी यांचे आत्मचरित्र) (इ.स.२००८)
  • निबंधलेखन
  • पंडिता रमाबाई (चरित्र)
  • परकीय ख्रिस्ती मिशनरींचे मराठी भाषाविषयक कार्य - सन १५४२ ते १९६० (माहितीग्रंथ)
  • मराठी प्रोटेस्टन्ट ख्रिस्ती समाज
  • महाराष्ट्राबाहेरील मराठी २००१ (संपादन सहाय; मुख्य संपादन - निरंजन उजगरे)
  • विष्णुशास्त्री चिपळूणकर (व्यक्तिचित्रण)
  • सागर (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - प्रतिभा जौहरी)
  • सांगी (काव्यसंग्रह)
  • सीमेवरून (काव्यसंग्रह)- (देशाच्या सीमेवर असलेले सैन्याधिकारी कवी मनोहर बाथम य़ांच्या ‘सरहद से’ आणि ‘फिर सरहद से’ या पुस्तकांतील निवडक कवितांचा मराठी अनुवाद)
  • हिरकणी (संगीतिका, सहलेखक - निरंजन उजगरे)

अनुपमा उजगरे यांनी संपादित केलेली पुस्तके

[संपादन]
  • काव्य भाषा - एकलव्य प्रकाशन (इ.स.२०००)
  • काळोखातील कवडसे (अंध कवींच्या कविता) (इ.स.२०००)
  • काळोखातील तिरीप (अंध लेखकांचे ललित गद्य लेखन) (इ.स.२०००)
  • महाराष्ट्राबाहेरील मराठी - मॅजेस्टिक प्रकाशन (इ.स.२००१)
  • मुंबई मराठी साहित्य संघातर्े प्रकाशित होणाऱ्या 'साहित्य' त्रैमासिकाच्या दिवाळी २०१९ अंकाच्या (ना.वा. टिळक विशेषांकाच्या) अतिथी संपादक
  • सोपी सुभाषिते - एकलव्य प्रकाशन (इ.स.२०००)
  • ज्ञानोदय (नियतकालिक) (जून २००३- मे २००४)

अनुपमा उजगरे यांनी सादर केलेले कार्यक्रम

[संपादन]
  • इंदिरा संतांची कविता
  • कवितेच्या काठावर
  • मर्ढेकरांपासून आजपर्यंत
  • स्मृतिचित्रे

अनुपमा उजगरे यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान

[संपादन]
  • शोभना भडसावले पुरस्कार १९९७
  • मराठी साहित्य परिषद(पुणे) यांच्यातर्फेचा कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुरस्कृत कुसुमाग्रज पुरस्कार २००४
  • कवी रा.ना. पवार स्मृतिपुरस्कार(सोलापूर) २००४
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे विशाखा पुरस्कार २००४
  • कविवर्य कृ.ब. निकुंब काव्यपुरस्कार(बेळगाव) २००४
  • २००५ साली मुबई येथे भरलेल्या विसाव्या मराठी मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • कोकण मराठी साहित्य परिषद (रत्‍नागिरी) यांचा आरती प्रभू पुरस्कार २००५
  • पद्मगंधा प्रतिष्ठान(नागपूर) यांचा कै. विठ्ठलराव बोबडे काव्य पुरस्कार २००५
  • यूआरएल फाउंडेशन(मुंबई) यांचा साहित्य गौरव पुरस्कार २००६
  • आशीर्वाद पुरस्कार(मुंबई) २००६
  • सन्मित्रकार स.पां. जोशी स्मृती पुरस्कार २०१०