षड्रिपू
Appearance
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू किंवा षडरिपू (सहा शत्रू) असे म्हणतात.
या भावनांमुळे मन अशांत होते. मन एकाग्र करण्यात यांमुळे अडचणी येतात.
- काम म्हणजे मानवी मनात नित्य निर्माण होणाऱ्या इच्छा. मग त्यात लैंगिक भावना सुद्धा येतात.
- क्रोध म्हणजे राग.(गुस्सा,चड़चिढाहट)
- लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीचा हव्यास, मिळविण्याची इच्छा, अतीव प्रेम.(लालच)
- मोह म्हणजे अज्ञानामुळे एखाद्या क्षणभंगुर गोष्टीशी मन संलग्न करणे, गुंतविणे.(आकर्षण,फळ आकर्षणामुळे कार्यरत)
- मद म्हणजे गर्व, अति अभिमान. (घमंड, अहंकार)
- मत्सर म्हणजे द्वेष, जळावू वृत्ती, दुसऱ्याची भरभराट, प्रगती सहन न होणे.(ईर्ष्या,जलन)
ह्या सहा विकारांमुळे जे रोग उत्पन्न होतात त्यांना मानस रोग असेही म्हणतात. मानस रोग अर्थात मनुष्यास होणारे विविध आजार.