जंजिरा संस्थान
Appearance
जंजिरा संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील कुलाबा एजन्सीतील एक संस्थान होते. काठियावाड मधील जाफराबाद हा देखील याच संस्थानाचा एक भाग आहे. संस्थानाचे आठ महाल आहेत.
राजधानी
[संपादन]या संस्थानाची राजधानी जंजिरा येथे आहे. जंजिरा हे नाव मूळ अरबी शब्द जझीराड म्हणजे बेट या शब्दाचा अपभ्रंश आहे.
क्षेत्रफळ
[संपादन]जंजिरा संस्थानाचे क्षेत्रफळ ८३९ चौरस किमी इतके होते.
संस्थानिक
[संपादन]या संस्थानाचे संस्थानिक सिद्दी वंशाचे होते. ते सुन्नी पंथाचे मुसलमान होते. येथील संस्थानिक नवाब ही पदवी लावत असत.
स्वातंत्र्योत्तर कालखंड
[संपादन]भारत स्वतंत्र झाल्यावर जंजिराच्या नवाबाने हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. हे संस्थान सध्याच्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे.