निलेश नारायण राणे
Appearance
निलेश नारायण राणे | |
कार्यकाळ इ.स. २००९ – इ.स. २०१४ | |
मागील | — |
---|---|
पुढील | विनायक राउत |
जन्म | १७ मार्च, १९८१ |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पार्टी |
पत्नी | प्रियांका राणे |
नाते | नारायण राणे (वडील) नितेश नारायण राणे (भाऊ) |
निलेश राणे (१७ मार्च १९८१ - हयात) हे भारतीय जनता पार्टी मधील एक राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते पंधराव्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले होते. निलेश राणे हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे ह्यांचे पुत्र आहेत. निलेश राणे ह्यांचे भाऊ नितेश नारायण राणे विद्यमान महाराष्ट्र विधानसभा सदस्य आहेत. निलेश राणे यांची प्रशासनावरील पकड, जनतेचा बळकट पाठिंबा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे आवडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. जनतेचे प्रश्न चुटकीसरशी सोडविण्यात ते तरबेज असल्याने जनपाठिंबा मोठा आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच स्वतः डॉक्टरेट असल्याने औद्योगिक क्षेत्रातील नामवंतांमध्ये आवडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-03-02 at the Wayback Machine.