महानदी
महानदी | |
---|---|
उगम | सिहाव छत्तीसगड |
मुख | धमतरी, आरंग, सिरपुर, शिवरीनारायण, चन्द्रपुर, संबलपुर, कटक, चंपारण, संबलपुर |
पाणलोट क्षेत्रामधील देश | छत्तिसगढ, ओडिशा |
उगम स्थान उंची | ८९० मी (२,९२० फूट) |
उपनद्या | शिवणाथ.(संगमस्थळ - खरगणी (बिलासपूर) ओंग.तेल |
महानदी ही भारताच्या ओडिशा राज्यातील मोठी नदी आहे. या नदीची लांबी ८५८ कि.मी. असून ही एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचे पाणलोट क्षेत्र सुमारे १,३२,१०० किमी२. आहे. प्राचीन काळात महानदी चित्रोत्पला तसेच नीलोत्पला या नावाने ओळखली जात होती. महानदी हिराकुड धरणासाठी देखील ओळखली जाते, जो १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा पहिला मोठा बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्प होता.
महानदीचा छत्तीसगड राज्यात उगम झाल्यानंतर ती ईशान्य दिशेला वाहते. छत्तीगडमधील बिलासपुर जवळ शिवनाथ नदी मिळाल्यानंतर ती पूर्वेला वळते व ओरिसात प्रवेश करते, नंतर कटक जवळ बंगालच्या उपसागरालाजावून मिळते. नदीचा विस्तार छत्तीसगड, ओरिसा त्याचप्रमाणे झारखंड, मध्यप्रदेश व महाराष्ट्र आहे.
महानदी वर दुधवा, हिराकुड, रविशंकर सागर हे धरणे आहेत.महानदीवर ओडिसा राज्यातील संबलपूर जिल्ह्यात हिराकुंड धरण असून हे धरण जगातील सर्वात लांब धरण आहे. या धरणाची लांबी 24.5 km आहे.महानदीच्या खोऱ्यात सिमालिपल हे BSR असून या खोऱ्यातच भितर कानिका हे राष्ट्रीय उद्यान मगरींसाठी प्रसिद्ध आहे.
महानदी च्या त्रिभुज प्रदेशाच्या जवळच ऑफिसमधील पारादीप हे बंदर असून पूर्व किनारपट्टीवरील प्रमुख लोह निर्यात बंदर आहे.