विल्यम गोल्डिंग
विल्यम गोल्डिंग | |
---|---|
विल्यम गोल्डिंग (इ.स. १९८३) | |
जन्म नाव | विल्यम जेराल्ड गोल्डिंग |
जन्म | १९ सप्टेंबर, इ.स. १९११ |
मृत्यू | १९ जून, इ.स. १९९३ (वय ८१) |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | इंग्लिश |
साहित्य प्रकार | कादंबरी, नाटक, कविता |
प्रसिद्ध साहित्यकृती | 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' |
पुरस्कार |
बुकर पुरस्कार (१९८०) नोबेल पारितोषिक (१९८३) |
विल्यम गोल्डिंग (१९ सप्टेंबर, इ.स. १९११ - १९ जून, इ.स. १९९३) हा एक ब्रिटिश साहित्यकार होता व तो लॉर्ड ऑफ द फ्लाईज या कादंबरीचा जनक म्हणून ओळखला जातो. इ.स. १९८३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिकाने त्याचा सन्मान करण्यात आला.[१]
शिक्षण
[संपादन]इंग्लंडमध्ये विल्टरशायरमधील ग्रामर स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर विल्यम गोल्डिंग याने ऑक्सफर्डच्या ब्रेसनोज महाविद्यालयात एम.ए. पर्यतचे शिक्षण पूर्ण केले.
जीवन
[संपादन]इ.स. १९४० ते इ.स. १९४५ या काळात विल्यम गोल्डिंगने ब्रिटिश नौदलातून दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला. युद्धापूर्वी एक वर्ष आणि युद्धानंतर सहा वर्षे त्याने शैक्षणिक क्षेत्रात मुख्याध्यापक म्हणूनही काम केले.
लॉर्ड ऑफ द फ्लाईज
[संपादन]गोल्डिंगने 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' ही कादंबरी इ.स. १९५४ साली लिहिली. अज्ञातस्थळी जाणारे एक विमान कोसळून एका बेटावर सक्तीने एकत्र राहावे लागलेल्या काही मुलांची कथा त्याने या कादंबरीत मांडली. कादंबरीतील या मुलांच्या वागण्यातून व बोलण्यातून हुकूमशाहीवादी प्रवृत्तींकडून लोकशाहीवाद्यांचा कसा पराभव होत जातो याचे चित्रण 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'मध्ये गोल्डिंगने केलेले आहे.जी.ए.कुलकर्णींनी त्याचे मराठी भाषांतर केले आहे.(१९८७,पॉप्युलर)
लेखन
[संपादन]- लॉर्ड ऑफ द फ्लाईज (कादंबरी) (इ.स. १९५४)
- द इनहेरिटर्स (कादंबरी) (इ.स. १९५५)
- पिंचर मर्टिन (कादंबरी) (इ.स. १९५६)
- द ब्रास बटरफ्लाय (नाटक) (इ.स. १९५८)
- फ्रि फॉल (कादंबरी) (इ.स. १९६०)
- द पिरॅमिड (कादंबरी) (इ.स. १९६७)
- द स्पायर (कादंबरी) (इ.स. १९६५)
- द स्कॉर्पियन गॉड (लघुकथासंग्रह) (इ.स. १९७१)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "The Nobel Prize in Literature 1983" (इंग्रजी भाषेत). २९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)