धन्वंतरी
God of medicine and physician of the gods | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
प्रकार | हिंदू दैवते, god | ||
| |||
भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत. भारतात दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. धन्वंतरी सागरमंथन वेळी अमृत घेऊन आले होते अशी आख्यायिका आहे. धन्वंतरी ह्यांना विष्णूचा अवतार व आयुर्वेदाचे आराध्य दैवत मानले जाते.
जन्म/निर्माण
[संपादन]इंद्र जेव्हा असुरांना घेऊन सागरमंथन करत होते तेव्हा चौदा रत्न निघाले. त्यांपैकी एक म्हणजे विष्णू अवतार देव धन्व॔तरी होय. धन्वंतरी अमृत घेऊन आले होते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू हा अमृताने भरलेला असतो अशी कल्पना आहे. भागवत पुराण या ग्रंथात विष्णू अवतारांपैकी हा एक अवतार मानला गेला आहे. याच्या कृपेमुळे वेगवेगळ्या औषधी देवांना मिळाल्या त्यामुळे त्याला देवांचा वैद्य म्हणून ओळखले जाते.
धनु किंवा धन्व म्हणजे शल्य (surgery) आणि अन्त म्हणजे शेवट म्हणजेच ज्याला शल्यतन्त्रामधील सर्व काही ज्ञात आहे असा धन्वंतरि.
वर्णन
[संपादन]ही देवता चतुर्भुज असून याच्या हातात, क्रमशः शंख, चक्र, अमृताचा कलश आणि जळू असतो.[१][२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Lord Dhanwantari" (इंग्रजी भाषेत). 2024-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ Lad, Vasant (2002). Textbook of Ayurveda (इंग्रजी भाषेत). Ayurvedic Press. p. 119. ISBN 978-1-883725-07-5.