चंचू वाळा सर्प
चंचू वाळा सर्प | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
| ||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||
ऱ्हायनोटायफ्लॉप्स अक्यूटस |
चंचू वाळा सर्प (शास्त्रीय नाव: Rhinotyphlops acutus) हा द्वीपकल्पीय भारतात सापडणारा छोट्या आकारमानाचा आंधळा, बिनविषारी साप आहे.
वर्णन
[संपादन]चंचू वाळ्याचा रंग सामान्यतः तपकिरी किंवा फिकट राखाडी असून पोटाकडचा भाग फिकट तपकिरी असतो. याचे शरीर दंडगोलाकार असून लांबी सरासरी ४५ सें.मी., तर अधिकतम ६० सें.मी. असते. चंचू वाळ्याच्या शरीराच्या मध्यभागी फिकट रंगाचे खवले असतात. याचे टोके छोटे असून चोचीसारखे टोक असलेले तोंड असते. याच शारीरिक वैशिष्ट्यामुळे याला 'चंचू वाळा सर्प' असे म्हणतात.
चंचू वाळ्याच्या शेपटीला छोटासा काटा असतो. हाताळला असता, हा साप आपल्या शेपटीचा काटा हाताळणाऱ्याच्या अंगात रुतवू पाहतो.
स्थानिक नावे
[संपादन]गोव्यात चंचू वाळ्यास 'टिल्यो' असे म्हणतात.
भौगोलिक आढळ
[संपादन]चंचू वाळा भारतात गंगेच्या खोऱ्याच्या दक्षिणेस सर्वत्र आढळतो.
वास्तव्य
[संपादन]चंचू वाळा मुख्यतः निशाचर असतो. याचे वास्तव्य जमिनीखाली, तर कधी कुजक्या लाकडाखाली किंवा वाळलेल्या पाल्या-पाचोळ्याखाली आढळते. सहसा फक्त पावसाळ्यात दिसतो. इतर वेळी जमिनीखाली दीर्घनिद्रा घेतो.
खाद्य
[संपादन]संदर्भ
[संपादन]- 'साप: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक', लेखक: निलीमकुमार खैरे, ज्योत्स्ना प्रकाशन, ISBN 81-7925-139-X