स्वप्नदोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वप्नदोष (Nocturnal emission) म्हणजे 'झोपेत वीर्य बाहेर येणे'. स्वप्नदोषास स्वप्नावस्था, नाईट फॉल, ओले स्वप्न, रात्रीचे वीर्य गळणे (स्खलन), झोपेत वीर्यपतन होणे असेही म्हटले जाते.

पुरुषांमध्ये झोपेत वीर्यस्खलन होणे किंवा स्त्रियांमध्ये झोपेत योनीसलील निर्माण होणे याला स्वप्नदोष असे म्हणतात. हा दोष नसून एक नैसर्गिक क्रिया आहे.

ही क्रिया मुख्यतः किशोरावस्थेत आढळून येते पण कुठल्याही वयात होणे सामान्य आहे. या क्रियेच्या वेळी पुरुषांना कामुक स्वप्ने पडू शकतात आणि ताठरतेशिवायही ही क्रिया होऊ शकते. पुरुषांमध्ये या क्रियेने जुने शुक्रजंतू काढून टाकले जातात व नव्या शुक्रजंतूंच्या निर्मितीस चालना मिळते. नियमितपणे हस्तमैथुन / संभोग करणाऱ्यांमध्ये ही क्रिया शक्यतो आढळून येत नाही.

किशोरवयामध्ये किंवा मुलं वयात येत असतानाच्या काळात कधी कधी झोपेत असताना लिंग ताठर होतं आणि वीर्य बाहेर येतं. जननेंद्रियांचं काम नीट चालू असल्याचं ते लक्षण आहे. मात्र अशा सामान्य घटनेला स्वप्नदोष असं नाव दिल्यामुळे त्यात काही तरी गैर आहे अशी भावना तयार होते. झोपेत वीर्य बाहेर येणे असा याचा साधा सरळ अर्थ आहे. स्वप्नावस्थेमध्ये मुलं/मुली किंवा स्त्री/पुरूष पाहत असलेलं स्वप्न लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करणारं असेल तर कदाचित लिंगाला ताठरता येऊन परमोच्च क्षणी वीर्यपतनदेखील होवू शकतं. मुलींनाही झोपेमध्ये लैंगिक स्वप्न पडू शकतात. अशावेळी योनी ओलसर होते. मुलींच्या परमोच्च लैंगिक क्षणाच्यावेळी योनीमधून कोणताही स्त्राव येत नाही. त्यांना केवळ मानसिक अनुभव मिळतो.

काळ[संपादन]

स्वप्न दोष कधी सुरू होतो व कधीपर्यंत टिकतो?

मुलगा/मुलगी वयात आल्यावर स्वप्नावस्था सुरू होते आणि संभोग सुरू केल्यानंतर ती थांबते. लैंगिक संबंध न ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये ही अवस्था दिसून येते. संभोगामुळे व्यक्तीची लैंगिक इच्छा पूर्ण होते त्यामुळे स्वप्नावस्था सहसा आढळत नाही. तथापि, स्वप्नावस्था वयाच्या कोणत्याही वर्षी येऊ शकते. विशेषतः लैंगिक संबंध ठेवत नसेल तर स्वप्नावस्था परत येऊ शकते.

कारणे[संपादन]

स्वप्नदोष (night fall) म्हणजे काय? आणि ते का होतं ?

स्वप्नदोष म्हणजे वीर्य उत्सर्जन (nocturnal emission or involuntary ejaculation) जे साधारतः किशोरवयीन मुलांमध्ये होतं. प्यूबर्टीच्या वेळी मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे वीर्य उत्सर्जन होते. ही नैसर्गिक क्रिया प्रौढ अवस्थेपर्यंत चालू असते. खरतर या प्रक्रियेत शरीरातील अतिरिक्त स्पर्म (शुक्राणू) आणि सीमन (वीर्य) बाहेर पडतात. मनात कोणत्याही प्रकारची अस्वस्थता असेल किंवा कामोत्तेजक स्वप्न पाहिल्यामुळे स्वप्नदोष होतो.

आरोग्याला धोका[संपादन]

यामुळे आरोग्याला काही धोका अजिबात नाही. जोपर्यंत व्यक्तिला कोणत्याही लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत नाही. हे अतिशय सामान्य आहे. शरीरातील अतिरिक्त स्पर्म सेक्स केल्याने किंवा हस्तमैथून केल्याने बाहेर पडतात. जर तुम्ही या दोघांपैकी काहीच करत नसाल तर ते स्वप्नदोषाद्वारे शरीराबाहेर पडतात.

उपाय[संपादन]

वैज्ञानिकदृष्ट्या स्वप्नदोष समस्येचे काही वाईट परिणाम होत नाहीत. काही उपाय आहेत ज्यामुळे स्वप्नदोषाचे प्रमाण आटोक्यात राहण्यास मदत होते.

झोपण्याआधी गरम पाण्याने अंघोळ करावी

गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीर व मनावरील थकवा दूर होऊन आराम मिळतो. तसेच झोपण्याआधी गरम पाण्याने अंघोळ केल्यास गाढ झोप लागते आणि स्वप्नदोषाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हे कसे होते तर तुमचे मन शांत असते. त्यामुळे ते अनेक गोष्टीचा विचार करत नाही अगदी कामभावनेचाही. त्यामुळे स्वप्न पडत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे स्वप्नदोष होत नाही.

कामउत्तेजक काही वाचू किंवा पाहू नये
 

जर व्यक्ती काही झोपण्याआधी भीतीदायक वाचलं किंवा पाहिलं तर तुम्हाला वाईट किंवा भीतीदायक स्वप्न पडतं. तसेच व्यक्तिने काही कामउत्तेजक वाचलं किंवा पाहिलं तर मेंदू त्या आठवणी होल्ड करून ठेवतो आणि परिणाम म्हणून तसंच स्वप्न पडतं. त्यामुळे स्वप्नदोष आटोक्यात आण्यासाठी रात्रीच्या वेळी काही कामउत्तेजक वाचू किंवा पाहू नये.

व्यायाम

व्यायामामुळे व्यक्ती फक्त तंदुरुस्त राहत नाही तर शांत झोपही लागते. यामुळे स्वप्नदोषाला प्रतिबंध होतो. जर यावर व्यक्तीला नैसर्गिक उपाय हवा असेल तर आयुर्वेदिक वैद्य व्यक्तीला शिलाजीत, वंग भस्म, ब्राह्मरी किंवा जायफळ घेण्याचा सल्ला देतात.