किशोरावस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किशोरावस्था ही बालपण आणि तारुण्य किंवा प्रौढावास्थेला यांच्यामधील आयुष्यकाळ होय.

महत्त्वाचे मुद्दे[संपादन]

 1. मानवी जीवनातील शारीरिक आणि मानसिक विकासातील अत्यंत वेगवान आणि महत्त्वाचा टप्पा.
 2. या अवस्थेत मानसिक विकासापेक्षा शारीरिक वाढ अधिक वेगाने होते. मानवाच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील कालखंड असतो. या कालावधीत घडणाऱ्या सर्वच चांगल्या वाईट घटनांचा मनावर परिणाम होते आणि यावे परिणाम अधिक काळापर्यंत राहतात.
 3. सभोवतालचे वातावरण , सहवासातील व्यक्ती या दोन्हींचाही या वयातील वाढ आणि विकासावर परिणाम होत असतो.
 4. नुकतेच किशोरावस्थेत प्रवेश केलेल्या मुला मुलींमध्ये भरकटण्याचा धोका अधिक असतो कारण त्यांच्या पूर्ण क्षमतांचा विकास झालेला नसतो. परंतु कुटुंबातील मोठ्या माणसांचे न ऐकण्याचा बंडखोरपणा वाढलेला असतो.
 5. या कालावधीत आरोग्यावर झालेल्या बदलांचा परिणाम हा दीर्घकालीन टिकू शकतो, जीवनशैलीवर दीर्घकालीन परिणाम होतो.
 6. कुंभार जसे ओल्या मातीला आकार देतो तसाच आकार या अवस्थेतील मुलामुलींना देण्याची गरज असते. कुंभाराचे सुबक मडके घडवताना प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते तसेच किशोरावस्थेतील मुला मुलींच्या शारीरिक व मानसिक विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते.
 7. मानवी आयुष्यातला असा कालावधी की ज्यात आरोग्याकडे, मानसिक व शारीरिक विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते.
 8. उत्तम जीवनशैली अंगीकारण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान मिळवण्याचा, भावनिक समृद्ध होण्याचा तसेच परस्परांशी उत्तम नाते संबंध जोडण्यास शिकण्याचा कालावधी म्हणजे किशोरावस्था.आवश्यक असणारे गुणधर्म आणि क्षमता विकसित करण्याचा कालावधी म्हणजे किशोरावस्था

जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये लहानपणापासून तारुण्याकडे जाण्याच्या सर्वच टप्प्यांसाठी काहीना काही मार्गदर्शक तत्त्व मांडलेले आहेत. या टप्प्यातील मुला मुलींची कशी काळजी घेतली गेली पाहिजे या विषयी अनेक जणांनी त्यांच्या साहित्यात वर्णन केले आहे. परंतु अजूनही काही देशांतील संस्कृती मध्ये या किशोरावस्थेतील मुला मुलींना योग्य ते मार्गदर्शन केले जात नाही. अनेक सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून या वयोगटातील मुला मुलींसाठी काम केले जाते.

किशोरावस्थेचे वयोगट

1-मानवी जीवनाच्या विकासाचा टप्पा दर्शवण्यासाठी वय हे एकमेव चांगले परिमाण आहे. यामुळे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यातील शारीरिक बदल अधोरेखित करणे शक्य होते. मग ते कोणत्याही देशाचे नागरिक असो किंवा कोणत्याही संस्कृतीशी संबंधित असो.

2-किशोरावस्था म्हणजे मानवी जीवनाचा १० वर्षे ते १९ वर्षाचा कालावधी

शारीरिक बदल[संपादन]

या वयातील मुला मुलींमध्ये त्यांच्या जननेंद्रियांमध्ये वाढ होत असलेली दिसून येते, गुप्तांगांवर केस येण्यास सुरुवात होते. उंची झपाट्याने वाढते. परंतु हे सगळे बदल प्रत्येक व्यक्ती नुसार वेगवेगळ्या वेगाने होतात. त्या व्यक्तीचा आहार, त्याला मिळणारी वागणूक या सगळ्या गोष्टींचा या बदलांवर परिणाम होत असतो.

मज्जासंस्थेतील बदल[संपादन]

या कालावधीत मज्जासंस्थेतील काही ग्रंथींमध्ये देखील बदल होतो. हे बदल संप्रेरकांशी संबंधित (Hormones) असतात परंतु संपूर्णपणे या बदलांवर अवलंबून नसतात. हे बदल मेंदूच्या काही भागामध्ये होत असतात. हे बदल एखाद्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी, भावनिक प्रतिसाद देणाऱ्या लीम्बिक संस्थेत होत असतात. याचवेळी मेंदूच्या पूर्व ग्रंथीमध्ये देखील बदल होत असतात. या बदलांमुळे माणसाची निर्णय क्षमता वाढण्यास मदत होते, व्यवस्थापन कौशल्य, भावनांवर नियंत्रण करण्याची क्षमता विकसित होत असते.

मानसिक व सामाजिक बदल[संपादन]

हे हार्मोनल आणि मज्जासंस्थेतील बदल या वयातील मुलांच्या सामाजिक आणि बौद्धिक बदलांशी जोडले गेले आहेत. किशोरावस्थेच्या पुढच्या टप्प्यात तर्क शक्ती (reasoning skill), निमुल्ये अधिक भक्कम होत जातात. समाजातील व आजूबाजूच्या वातावरणातील घटनांचा या बदलांवर परिणाम होत असतो. ज्या वातावरणात किशोरावस्थेतील मुलं –मुली वाढत असतात त्या वातावरणाचा , तेथील नीतीमूल्यांचा मुलांच्या वाढ व विकासावर परिणाम होत असतो.

वर्तनाचा आणि आरोग्याचा होणारा परिणाम[संपादन]

बालपण आणि तारुण्य या प्रवासात या मुलांना अनेक शारीरिक व मानसिक बदलांना तसेच आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषतः प्रजनन संस्थेशी संबंधित बदल या मुलाना अस्वस्थ करतात. मुलींना अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते.

या वयातील मुलांसाठी जागतिक आरोग्य संस्थेने पुढील ९ निरीक्षणे सुचवली आहेत:[संपादन]

 • या वयातील मुला मुलींवर सतत जागरुकतेने लक्ष ठेवण्याची गरज असते
 • सर्व मुलं एकसारखी नसतात हे कायम लक्षात ठेवले पाहिजे
 • बऱ्याचदा या वयातील मुला मुलींना समाजातील काही घटकांमुळे असुरक्षित वाटू शकते, अशा वेळी त्यांना समजून घेण्याची आवश्यकता असते.
 • या कालावधीत होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांमुळे या मुला मुलींच्या आरोग्यावर परिणाम होत असतात.
 • या कालावधीत झालेल्या बदलांचे परिणाम कायमस्वरूपी असतात.
 • या वयोगटातील मुलं मुली यांची वैचारिक क्षमता कशी आहे किंवा ते काय विचार करतात त्याचा देखील आरोग्यावर परिणाम होत असतात.
 • या कालावधीत होणारे सर्व बदल लक्षात घेऊन घरातील आणि समाजातील मोठ्या माणसांनी या मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 • सार्वजनिक आरोग्याचा व मानवी विकासाचा विचार करताना समाजातील या अतिशय महत्त्वाच्या घटकाचा विचार केला गेला पाहिजे.

किशोरावस्थेत मुलांमध्ये आणि मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल पुढील प्रमाणे[संपादन]

किशोरी मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल[संपादन]

 • मुलींमध्ये साधारणपणे ८ ते १३ वर्षाच्या कालावधीत बदल सुरू होतात. या कालावधीत स्तनांची वाढ होण्यास सुरुवात होते.
 • गुप्तांगांवर केस येण्यास सुरुवात होते.
 • योनीमार्गातून क्वचित प्रसंगी स्त्राव बाहेर येण्यास सुरुवात होते.
 • मासिक पाळी सुरू होते
 • अचानक उंची वाढते.
 • कंबरेचा भाग रुंदावतो

किशोरवयातील मुलांमध्ये होणारे शारीरिक बदल[संपादन]

 • अंडकोशांचा आकार वाढतो.
 • जननेंद्रीयांवर केस येण्यास सुरुवात होते.
 • शरीराच्या इतर अवयवांपेक्षा हातापायांची वाढ वेगाने होते. एकदम उंची वाढते

संदर्भ[१][संपादन]

 1. ^ "WHO | Adolescent development". WHO. 2020-04-05 रोजी पाहिले.