अस्मितादर्श साहित्य संमेलन
डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या संपादकत्वाखाली अस्मितादर्श नावाचे त्रैमासिक निघत असते. ते त्रैमासिक दरवर्षी अस्मितादर्श साहित्य संमेलन भरवते.
यापूर्वीची अस्मितादर्श साहित्य संमेलने
[संपादन]- ?वे संमेलन - १९८६ -नाशिक. संमेलनाध्यक्ष : निर्मलकुमार फडकुले
- ?वे संमेलन - १९९२ जालना. संमेलनाध्यक्ष : त्र्यंबक सपकाळे
- २०वे संमेलन -चंद्रपूर.
- २८वे संमेलन - चंद्रपूर. १२-१३ एप्रिल २००९; संमेलनाध्यक्ष : डॉ.ओमप्रकाश वाल्मीकी..."दलित साहित्यच खरे भारतीय साहित्य आहे. त्यात प्रेम, समता आणि बंधुतेचा विचार आहे. यात ना भाषेचा भेद आहे, ना क्षेत्रवादाला स्थान. त्यामुळे देशाला खऱ्या अर्थाने दलितीकरणाची गरज आहे, असे प्रतिपादन "जुठन'कार ओमप्रकाश वाल्मीकी यांनी केले."
- २९वे संमेलन - २३-२४ आॅक्टोबर २०१० -परभणी. संमेलनाध्यक्ष : प्रा.रामनाथ चव्हाण.
- ३०वे संमेलन - २४-२५ डिसेंबर २०११ -कळंब(उस्मानाबाद जिल्हा). संमेलनाध्यक्ष : प्रा. भास्कर चंदनशिव
- ३१वे संमेलन - २५-२६ नोव्हेंबर २०१२ -जळगाव. संमेलनाध्यक्ष : डॉ.कृष्णा किरवले
- ३२वे संमेलन - नांदेड येथे, २-३- जानेवारी २०१५ या कळात झाले. संमेलनाध्यक्ष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे हे होते.
- ३३वे संमेलन - वशीम येथे १३ व १४ फेब्रुवारी २०१६ दरम्यान झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रविचंद्र हडसनकर होते.
- ३४वे संमेलन - लातूर येथे, १४-१५ जानेवारी २०१७ या दिवशी झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. प्रज्ञा पवार होत्या.
- ३५वे संमेलन - जालना येथे, २७-२८ आॅक्टोबर २०१८, संमेलनाध्यक्ष डी. बी. जगत्पुरिया.
---
- ३१व्या साहित्य संमेलनात केलेल्या सूचना आणि पास झालेले ठराव :
- सूचना
- सरकारमधील आंबेडकरवादी मंत्र्यांनी गांधी टोपीऐवजी निळी टोपी घालावी.
- ठराव
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावे.
२. डॉ. आंबेडकर यांच्या इंग्रजी साहित्याचा मराठीत अनुवाद करावा.
३. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बुद्धांच्या (?) ताब्यात देण्यात यावे.
४. महाविहारात अन्य धर्मीयांकडून करण्यात येणाऱ्या कर्मकांडावर पूर्णपणे बंदी घालावी.
५. केंद्र सरकारने तत्त्वत: मान्य केलेली इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सहा डिसेंबरच्या आत ताब्यात द्यावी.
६. केंद्र सरकारच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय बौद्ध विहार निर्माण करावा.
७. सरकारने दलित व आंबेडकरवादी वृद्ध कलाकारांना मानधन द्यावे.
८. आंबेडकरी चळवळीतील वृद्ध कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणे भीमसैनिक अशी मान्यता देऊन वार्षिक मानधन द्यावे.
९. अजिंठा डोंगरावर भगवान बुद्धांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.. वगैरे.
यामागील आणि पुढील संमेलनांमध्ये अशाच प्रकारचे ठराव पास होत होते.