ब्रिटिश सोमालीलँड
ब्रिटिश सोमालीलॅंड धूल्का ब्रिटिशका ई सोमालिया الصومال البريطاني | ||||
|
||||
|
||||
राजधानी | हारगेइसा | |||
अधिकृत भाषा | इंग्लिश, सोमाली | |||
धर्म | इस्लाम | |||
राष्ट्रीय चलन | इस्ट आफ्रिकन शिल्लिंग्ज |
ब्रिटिश सोमालीलॅंड (सोमाली: Dhulka Biritishka ee Soomaaliya ; अरबी: الصومال البريطاني , अल-सुमाल अल-ब्रितानीय; इंग्लिश: British Somaliland) हे वर्तमान सोमालियाच्या उत्तरेकडील भूप्रदेश व्यापणारे ब्रिटिश संरक्षित राज्य होते. हे इ.स. १८८४ ते इ.स. १९६० या कालखंडात अस्तित्वात होते. अस्तित्वकाळातल्या बह्वंशी कालखंडात हे राज्य फ्रेंच सोमालीलॅंड, इथिओपिया व इटालियन सोमालीलॅंड या राज्यांनी वेढला होता. इ.स. १९४०-४१ या कालावधीत इटालियनांनी यावर कब्जा मिळवून आपल्या इटालियन पूर्व आफ्रिका या वसाहतीस जोडला. १ जुलै, इ.स. १९६० रोजी हे संरक्षित राज्य स्वतंत्र होऊन अल्पावधीसाठी सोमालीलॅंडचे राज्य या नावाने अस्तित्वात आले. त्यानंतर आठवड्याभरातच सोमालीलॅंडच्या राज्याचे सोमालियाच्या विश्वस्त राज्याशी (भूतपूर्व इटालियन सोमालीलॅंड) एकत्रीकरण करून सोमाली प्रजासत्ताक स्थापण्यात आले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |