सलाबतखानाची कबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अहमदनगरच्या निजामाचा वजीर, दुसरा सलाबतखान याची कबर अहमदनगर शहराजवळील शहा टेकडीवर आहे.

ठिकाण[संपादन]

अहमदनगर शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर (खरे तर टेकडीवर) चांदबिबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी एक अष्टकोनी वास्तू आहे. लोक गैरसमजुतीने या वास्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले, तरी वस्तुतः ती दुसऱ्या सलाबतखानाची कबर आहे.[१]

महाल[संपादन]

दुसऱ्या सलाबतखानाने १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला.या महालाची इमारत तीन मजली असून चिरेबंदी व अष्टकोनी आहे. इमारतीची उंची ७० फूट आहे. महालाच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. इमारतीच्या भिंतींना तिरप्या फटी असल्याने दिवसभर या इमारतीत सूर्याची किरणे पोचतात.

सलाबतखान(दुसरा)[संपादन]

सलाबतखान(दुसरा), हा इसवी सनाच्या १५५५ मध्ये गादीवर आलेला चौथा निजाम मूर्तजा याचा वजीर होता. वेडसर मूर्तजाने त्याच्या चंगीजखान या वजिराला संशयावरून मृत्युदंड दिला, आणि त्याच्या जागी १५७९ मध्ये सलाबतखान(दुसरा)ची नेमणूक केली होती. या दुसऱ्या सलाबतखानाने अहमदनगर शहरात खापरी नळातून पाणी आणले. हा सलाबतखान अहमदनगरमध्ये तेथील लोकांना त्या काळी आवडत असे.[२] सलाबतखान(दुसरा)ने अहमदनगर शहराजवळ शहा टेकडीवर महालही बांधला. या महालात त्याच्या मृत्यूनंतर त्याची कबर बनवली गेली.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक[संपादन]

या कबरीला ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-04. 2016-01-20 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-03-04. 2016-01-20 रोजी पाहिले.
  3. ^ "नोटिफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्युमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-03-04. २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)