विकिपीडिया:नवीन माहिती/१ सप्टेंबर २०११
Appearance
- ...की मुंबईतल्या लालबागच्या राजाची स्थापना लालबागमध्ये कायमस्वरुपी बाजार होण्याचा नवसासाठी केली गेली?
- ...की मराठी संगीतकार दशरथ पुजारी आणि श्रीनिवास खळे यांचा जन्म गुजरातमधील वडोदरा शहरात झाला होता?
- ...की हेलिपॅडवर एका वर्तुळात रोमन लिपीत H अक्षर काढून हेलिकॉप्टर उतरण्याचे नेमके स्थान दर्शविले जाते?
- ...की सेल्लप्पन रामनाथन हा तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी इ.स. १९९९ ते इ.स. २०११ या काळात तेथील राष्ट्राध्यक्ष होता?
- ...की हिंडेनबर्ग या हायड्रोजन वायूने भरलेल्या विमानाला आग लागूनही त्यातील दोन तृतीयांश प्रवासी वाचले?
- ...की दुसरे महायुद्ध संपल्यावर जर्मनीतील न्युर्नबर्ग (न्युरेम्बर्ग) शहरात जर्मन व नाझी अधिकार्यांवर ज्यूंचे शिरकाण करण्याबद्दल व इतर युद्धगुन्ह्यांबद्दल खटले चालविले गेले?
- ...की भारताच्या खेमकरण गावाला रणगाड्यांची दफनभूमी म्हणतात?
- ...की लिब्याचा हुकुमशहा मुअम्मर अल-गद्दाफी सलग ४२ वर्षे सत्तारूढ होता?