अतिन बंदोपाध्याय
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अतिन बंदोपाध्याय (१९ मार्च १९३४ – १९ जानेवारी २०१९). भारतातील सुप्रसिद्ध बंगाली भाषा साहित्यिक. त्यांचा जन्म बांग्लादेशातील ढाका जिल्ह्यातील रेनाडी विभागातील हिजाडी गावी झाला. १९४७ मध्ये बंगालच्या विभाजनानंतर घडलेल्या घटना, दंगली, हिंसाचार, हिंदू आणि मुसलमानाचे यांच्यातील जातीय आणि धार्मिक तणाव अशा परिस्थितीत त्यांनी आशा, आकांक्षा, भ्रमनिराशता आणि स्वतःच्या मातृभाषेपासून म्हणजे मायबोली पासून विभक्त होण्याची शक्यता इत्यादी मुल्ये त्यांच्या साहित्यात अतिशय संवेदनशीलपणे प्रकट केली आहेत.
अखंड भारतातील म्हणजे पूर्वबंगालमध्ये त्यांनी त्यांचे बालपण व्यतीत केले. त्यांचे शिक्षण पनम स्कूल मध्ये झाले. पण पुढे बंगालच्या विभाजनानंतर त्यांनी भारतात स्थलांतर केले. पदव्युत्तर पदवी पर्यंतचे उच्च शिक्षण त्यांनी घेतले. नंतर तत्कालीन कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. नाविक ट्रक क्लीनर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी केली. सतीई राजेंद्र नारायण हायस्कूल चौवारीगचा जिल्हा मुर्शिदाबाद येथील शाळेत ते मुख्याध्यापक झाले. कोलकत्ता येथे एका औद्योगिक कारखान्यात व्यवस्थापक, प्रकाशन सल्लागार, आणि शेवटी पत्रकार म्हणून काम केले. सेवानिवृत्तीनंतर कोलकत्ता येथे कायमस्वरूपी स्थाईक झाले.
यांची पहिली कथा बेहरामपूर येथील नियतकालिकात प्रकाशित झाली. कृती विभाजनावरील टेट्रालॉजी चार भागातील खंड म्हणून त्यांना टेट्रालॉजी हे नाव दिले आहे.
साहित्याचा आढावा पुढीलप्रमाणे
[संपादन]कादंबरी
[संपादन]- समुद्र मानुस (१९६०)
- समुद्र पकीरखाना ( १९६३)
- नग्न ईश्वर (१९६७)
- शेस दृश्य (१९६७)
- राजा जाये बनवासे (१९७१)
- तकन हेमनटकल (१९७२)
- ऐकती जालेर रेखा (१९८७)
- अन्नभोग (१९९०), कापशी (१९९७)
लघुकथा
[संपादन]- एकलर बम्ला गल्प (१९७४)
- मानुसर घरबारी (१९७८)
- पंचास्ती गल्प (१९९१)
- दुई किशोरी दुई प्रेमिक (२००७)
- बायोस संधी (२००९)
त्यांच्या साहित्यामध्ये अविभाजित बंगालमधील ग्रामीण जीवनाचे स्पष्ट, सुंदर आणि विलोभनीय असे वर्णन आहे. आपल्या पत्रकारिता आणि प्रौढाबद्दलच्या कल्पनेव्यतिरिक्त लहान मुलांसाठी विविध कल्पना त्यांनी शब्दबद्ध केलेल्या आहेत.
पुरस्कार
[संपादन]- साहित्य अकादमी पुरस्कार (१९९१)
- बिभूती भूषण पुरस्कार (१९९०)
- तारास्कर पुरस्कार (१९९१)
- मटीलाल पुरस्कार (१९८३)
वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.