Jump to content

हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड (कोल्हापूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेल्पर्स ऑफ दि हॅ्न्डिकॅप्ड ही कोल्हापूर शहरात स्थापन झालेली एक स्वयंसेवी संस्था आहे. मुख्य उद्देश म्हणजे

स्थापना

[संपादन]

अपंगांच्या सर्वांगीण पुनर्वसन कार्यासाठी १९८४ साली कोल्हापूरमध्ये ‘हेल्पर्स ऑफ दि हॅ्न्डिकॅप्ड’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा डॉ. नसीमा मोहम्मद अमीन हुरजूक यांना वयाच्या १६व्या वर्षी पराकोटीचे शारीरिक अपंगत्व आले. जिद्दीने आणि घरच्यांच्या सहकार्याने त्यांनी स्वतःचे आयुष्य पुन्हा उभे केले. दोन्ही पायांना पोलिओ असलेल्या तसेच कोल्हापुरातील प्रसिद्ध गायिका रजनी करकरे-देशपांडे या व्यक्तीशी नसीमा यांची मैत्री झाली. त्यांचे गुरू बाबूकाका दिवाण याच्या प्रेरणेने अपंगांच्या पुनर्वसनासाठी दोघी कार्यरत झाल्या. या कार्यात त्यांना मनोहर देशभ्रतार तसेच पी.डी. देशपांडे यांसारखे काही सहकारी, हितचिंतक व देणगीदारही मिळाले.[]

संस्थेची उद्दिष्टे

[संपादन]
  • अपंगाचे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक, वैवाहिक आदि सर्वांगीण पुनर्वसन करणे.
  • त्यासाठी आवश्यक सोयी, सुविधा उपलब्ध करून देणे, जनजागृती करणे.
  • अपंगांना स्वावलंबी व समाजासाठी उपयुक्त घटक बनवून सक्षम बनवणे हे संस्थेचे ध्येय आहे.[]

कार्यविस्तार

[संपादन]
  • सुरुवातीला कोल्हापुरातच संस्थेत येणाऱ्या अपंगांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना वैद्यकीय मदत, कृत्रिम साधने मिळवून देणे अशा स्वरूपाचे काम सुरू झाले.
  • ‘घरोंदा वसतिगृह तथा पुनर्वसन केंद्र’ - हे उंचगाव पूर्व, ता.करवीर, जि.कोल्हापूर येथे कोल्हापूरपासून ९ किमी अंतरावर आहे. इथे अपंगांना स्वावलंबी होता येईल अशा आवश्यक सुविधांचा विचार केला गेला आहे.
  • शेजारीच संस्थेची ‘समर्थ विद्यामंदिर’ (बालवाडी ते ८वी) व ‘समर्थ विद्यालय’ (९वी व १०वी) शाळा आहेत. अपंग-सुदृढ यांना एकत्र शिक्षण देणाऱ्या या शाळेत समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेतात.
  • संस्थेचे ‘अपंगार्थ व्यवसाय प्रशिक्षण केंद्र’, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, उंचगाव, कोल्हापूर येथे आहे. येथे सर्व प्रकारची कृत्रिम साधने आणि शाळा व ऑफिससाठी लागणारे फर्निचर बनविले जाते.
  • ‘स्वप्ननगरी’ - गाव-मोरे, पो.वाडोस, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग येथे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या वा बौद्धिक अक्षमतेमुळे शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या तसेच रोजगाराची आवश्यकता असणाऱ्या अपंगांच्या सक्षमीकरणासाठी व्यावसायिक पुनर्वसन केंद्र चालू आहे. येथेच ‘लाजवाब काजू प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रही’ आहे. १००हून अधिक अपंग व्यक्तींना इथे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.[]
  • संस्था मुख्यालयात येणाऱ्या लाभार्थ्यांची मोफत नोंदणी होते. त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यांना मदत केली जाते. २०१५ सालापर्यंत संस्थेने २५,०१९ लाभार्थ्यांना साहाय्य पुरविले आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-05 at the Wayback Machine.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "पायावर उभं करताना ." Loksatta. 2019-07-19 रोजी पाहिले.
  2. ^ a b http://www.pudhari.com/news/kolhapur/14847.html#
  3. ^ "अपंगांचा आधारवड". लोकसत्ता. २२ सप्टेंबर २०१८. १९ जुलै २०१९ रोजी पाहिले.