चकयार कूथु
चकियार कूथू हा केरळ भारत येथील एक प्रकारचा परफॉर्मन्स आर्ट आहे. प्रामुख्याने एक प्रकारचा अत्यंत परिष्कृत एकांकिकेचा प्रकार आहे. यात कलाकार हिंदू महाकाव्य (जसे की रामायण आणि महाभारत) आणि पुराणातील कथा सांगतात.[१] तथापि, हे आधुनिक स्टँड-अप कॉमेडीशी पारंपारिक समतुल्य देखील आहे. यात कधीकधी सध्याच्या सामाजिक-राजकीय घटनांवर भाष्य करणे (आणि प्रेक्षकांच्या सदस्यांना निर्देशित वैयक्तिक टिप्पण्या) देखील समाविष्ट असते.[२]
प्रदर्शन
[संपादन]"कुथू" म्हणजे नृत्य असते. परंतु हे या कलेसाठीचे चुकीचे नाव आहे, कारण यात चेहऱ्यावरील भावावर भर दिला जातो. त्यामानाने नृत्यदिग्दर्शन फार कमी असते. याचे प्रदर्शन कुथंबळम येथे केले जाते. ही जागा हिंदू मंदिरांच्या आत असलेले एक ठिकाण असते. जे विशेषतः कुटीयट्टम आणि चकियार कूथू कामगिरीसाठी डिझाइन केलेले असते. आदर्शपणे, हे प्रदर्शन सणांच्या संयोगाने होते, जे चकियार या समुदायासह अंबालावासी नांबीअर करतात.
ही कला एकट्याने सादर करण्याची कल आहे. ज्यामध्ये एक विशिष्ट शिरस्त्राण आणि काळ्या केसाळ मिश्या परीधान केल्या जातात. कथाकाराचे शरीर चंदनाने लेपले जाते आणि संपूर्ण शरीरावर लाल ठिपके काढले जातात. शिरस्त्राण हे सापाच्या टोपीसारखे असते, जे अनंत, हजार डोके असलेल्या सापाचे प्रतीक आहे.[३]
चकियार संस्कृत शैली चंपू प्रबंधवर आधारित कथा असतात. चंपू प्रबंधात गद्य आणि कविता (श्लोक) यांचे मिश्रण असते. कलाकार मंदिराच्या देवताला नमन करून सुरुवात करतो. त्यानंतर तो संस्कृतमध्ये एक श्लोक सांगतो आणि नंतर त्या श्लोकाचा मल्याळम भाषेमध्ये अर्थ समजावून सांगतो. कथा सांगताना वर्तमान घडामोडी आणि स्थानिक परिस्थितीशी समांतर रेखाटण्यासाठी विनोद वापरला जातो.
कुथू ही कला परंपरागत केवळ चकियार समुदायच सादर करतो. याच्या सादरीकरणात दोन वाद्यं असतात-एक मिझावु आणि एक जोडी इलथालम. स्त्रियांनी सादर केल्यास याला नांगीर कूथू म्हणतात. या स्त्रियांना नांग्यारम्मा म्हणून संबोधतात. या स्त्रिया नामबीर समुदायाच्या असतात. ही एक अधिक अत्यंत परिष्कृत मानलेली थिएटर कला आहे.
मणी माधव चकियार
[संपादन]चकियार कूथू मूळतः केवळ हिंदू मंदिरांच्या कूथंबळममध्ये सादर केले जात असे. ते एक नाट्यचार्य होते. याचा अर्थ एक महान शिक्षक आणि नाट्यमचे (नाट्यशास्त्र) अभ्यासक असा होतो. त्यांना पद्मश्री ही पदवी सन्मानार्थ देण्यात होती. मणी माधव चकियार हे कुथू आणि कुडियट्टम यांना मंदिराबाहेर सामान्य लोकांपर्यंत नेणारे हे कलाप्रेमी होते. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन मध्ये चकियार कूथू सादर करणारे ते पहिले व्यक्ती होते. अनेक लोक त्यांना आधुनिक काळातील सर्वात महान चकियार कूथू आणि कुटीयट्टम कलाकार मानतात. कथा अशी आहे की त्यांचे गुरु, रामा वर्मा परिक्षित थंपुरन यांनी प्रहलादाचारिता नावाचे संस्कृत चंपू प्रबंध लिहिले. आणि काही ज्येष्ठ कलाकारांना अभ्यास करून ते सादर करण्याची विनंती केली. पण त्यांना ते करणे अशक्य वाटले. त्यानंतर तरुण मणी माधव चाकियार यांची पाळी आली. त्यांनी ते मान्य केले. रात्रभर त्याचा अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी त्रिपुणीथुरा येथे त्याचे सादरीकरण केले. नंतर कोचीन राज्याच्या राजधानीतहे त्यांनी त्याचे साअरीकरण केले. या घटनेमुळे संस्कृत आणि शास्त्रीय कला या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांचे प्रभुत्व सिद्ध झाले. काही महिन्यांनंतर, त्यांनी संपुर्ण प्रहलादाचारिता स्टेज वर सादर केले.
स्वर्गीय अम्मनूर माधव चाकियार आणि पेनकुलम रमन चकियार या कला प्रकारातील २० व्या शतकातील महत्त्वाच्या व्यक्ती होत्या.
हेही पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- ^ "<meta HTTP-equiv="Content-Type" content="text/HTML; charset=iso-8859-1"/> NameBright - Coming Soon". 11 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 October 2009 रोजी पाहिले.
- ^ "Latest India News | Breaking News | World & Business News | Sports & Entertainment news". Expressbuzz.com. 2013-09-30 रोजी पाहिले.[मृत दुवा]
- ^ "<meta HTTP-equiv="Content-Type" content="text/HTML; charset=iso-8859-1"/> NameBright - Coming Soon". 11 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 October 2009 रोजी पाहिले.