डॉजर स्टेडियम
Appearance
डॉजर स्टेडियम हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलस शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या लॉस एंजेलस डॉजर्स संघाचे घरचे मैदान आहे. याची निर्मिती १९६२मध्ये झाली. बॉस्टनच्या फेनवे पार्क आणि शिकागोच्या रिगली फील्डनंतर एमएलबीमधील हे सगळ्यात जुने मैदान आहे. [१] [२] आसन क्षमतेनुसार जगातील सर्वात मोठे बेसबॉल मैदान आहे. [३]
है मैदान १९६२-६५ दरम्यान लॉस एंजेलस एंजेल्स संघाचेही घरचे मैदान होते. त्यावेळी त्याला शावेझ रेव्हिन स्टेडियम असे नाव होते.
इतर खेळ
[संपादन]क्रिकेट
[संपादन]या मैदानावर १५ नोव्हेंबर, २०१५ रोजी क्रिकेट ऑल-स्टार्स मालिका २०१५ चा तिसरा आणि अंतिम सामना खेळला गेला. यात सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांच्यासह जगभरातील अनेक निवृत्त क्रिकेट खेळाडू खेळले.
ऑलिम्पिक
[संपादन]- १९८४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये या मैदानावर बेसबॉलचे सामने खेळले गेले. [४] [५] [६]
- २०२८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये येथे बेसबॉल आणि सॉफ्टबॉलचे सामने खेळले जातील.
संदर्भ
[संपादन]- ^ "Dodger Stadium Construction Facts".
- ^ "PCAD – Chavez Ravine Stadium, Los Angeles, CA". pcad.lib.washington.edu. 2020-06-10 रोजी पाहिले.
- ^ "The Most Popular Sports Teams & Stadiums on TikTok". PinMart. August 5, 2023 रोजी पाहिले.
- ^ Cava, Pete (Summer 1992).
- ^ Official Report of the Games of the XXIIIrd Olympiad Los Angeles, 1984.
- ^ 1984 Los Angeles Dodgers Media Guide https://www.amazon.com/Dodgers-Media-Guide-Steve-Brener/dp/B0096H2STO