रिगली फील्ड
रिगली फील्ड हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो शहरात असेलले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या शिकागो कब्स संघाचे घरचे मैदान आहे. रिगली फील्डची रचना १९१४मध्ये त्यावेळेसच्या फेडरल लीगमधील शिकागो व्हेल्स संघासाठी करण्यात आली होती. त्यावेळी या मैदानाला वीघमन पार्क असे नाव होती. रिग्ली कंपनी या च्युइंग गम बनविणाऱ्या कंपनीच्या मालक विल्यम रिग्ली जुनियरने १९२१मध्ये कब्स आणि पर्यायाने हे मैदानही विकत घेतले. त्यावेळी याचे नाव कब्स पार्क असे ठेवले गेले. १९२७मध्ये याा रिगली फील्ड असे नाव दिले गेले. या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४१,६४९ इतकी आहे.
रिगली पार्क याच नावाचे वेगळे मैदान लॉस एंजेलसमध्येही आहे.
इतर खेळ
[संपादन]अमेरिकन फुटबॉल
[संपादन]नॅशनल फुटबॉल लीगचा शिकागो बेर्स हा संघ १९२१-७० दरम्यान खेळत असे.
फुटबॉल
[संपादन]नॉर्थ अमेरिकन सॉकर लीगचा शिकागो स्टिंग संघ १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस काही सामने रिगली फील्ड वर खेळत असे.[१]
संगीतमैफिली
[संपादन]२००५ पासून रिगली फील्ड वर अनेकदा संगीत मैफली होतात. [२]
नोंदी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Tierney, Mike (August 22, 1979). "Luck Writes Rowdies' Playoff Script". St. Petersburg Times. April 17, 2009 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Wrigley digs deeper into the big concert biz". Chicago Tribune. 2017-08-27 रोजी पाहिले.