Jump to content

पी.एम.पी.एम.एल.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (संक्षेप: पी.एम.पी.एम.एल.) ही पुणे महानगरपालिकेची आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. पुणे महानगर परिसराला बससेवा पुरवणाऱ्या ह्या संस्थेची स्थापना १९ ऑक्टोबर २००७ रोजी पुणे शहरामधील पुणे महानगर परिवहन (पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट / PMT)पिंपरी चिंचवड शहरामधील पिंपरी चिंचवड महानगर परिवहन (पिंपरी चिंचवड म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट / PCMT) ह्या दोन परिवहन कंपन्यांच्या एकत्रीकरणामधून झाली.

पी.एम.पी.एम.एल.च्या १३००हून अधिक बसगाड्यांच्या दररोज सुमारे १९,००० फेऱ्या होतात.

सध्या पी.एम.पी.एम.एल.च्या बस सेवेचे ३६५ मार्ग व ३२७८ थांबे असून दररोज सुमारे ८ लाख प्रवासी ही सेवा वापरतात. पी.एम.पी.एम.एल.चे मुख्यालय पुण्यामधील स्वारगेट येथे आहे. मुंबईतील बेस्ट नंतर सर्वात मोठी बससेवा म्हणून पी.एम.पी.एम.एलचे नाव घेतले जाते.

आगारे (डेपो)

[संपादन]
  1. स्वारगेट
  2. हडपसर
  3. मार्केटयार्ड
  4. अप्पर
  5. कात्रज
  6. कोथरुड
  7. बालेवाडी
  8. निगडी (भक्ती-शक्ती)
  9. पिंपरी
  10. भोसरी
  11. पुणे स्टेशन
  12. नरवीर तानाजी वाडी
  13. भेकराईनगर
  14. शेवाळेवाडी
  15. नवीन पुणे

महत्त्वाची बस स्थानके

[संपादन]

स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानक, पुणे मनपा, कात्रज, निगडी,नवीन पुणे

रातराणी बस सेवा

[संपादन]

मार्ग क्र.२ (रातराणी)

(जाताना) कात्रज ते शिवाजीनगर

(येताना) शिवाजीनगर ते कात्रज

मार्ग क्र.२४ (रातराणी)

(जाताना) कात्रज ते पुणे स्थानक

(येताना) पुणे स्थानक ते कात्रज

मार्ग क्र. १८४अ (रातराणी)

(जाताना) स्वारगेट ते हडपसर

(येताना) हडपसर ते स्वारगेट

मार्ग क्र. २०३ (रातराणी)

(जाताना) हडपसर ते पुणे स्थानक

(येताना) पुणे स्थानक ते हडपसर

पुणे दर्शन बस सेवा

[संपादन]

पर्यटकांकरिता पुणे दर्शन बस सेवादेखील उपलब्ध आहे. या सेवेद्वारे २५ किलोमीटरच्या मार्गात एकूण १६ स्थळांना भेट दिली जाते. तसेच ३ ठिकाणांचे बाह्यदर्शन केले जाते.

  1. केसरीवाडा
  2. शनिवारवाडा
  3. लाल महाल
  4. महात्मा फुले वाडा
  5. राजा केळकर संग्रहालय
  6. चतुर्श्रुंगी मंदिर
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय
  8. जोशी रेल्वे संग्रहालय
  9. पु. ल. देशपांडे उद्यान
  10. सारसबाग
  11. महालक्ष्मी मंदिर
  12. शिंदे छत्री
  13. युद्ध मुर्ती
  14. आदिवासी वस्तू संग्रहालय
  15. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय
  16. आगाखान पॅलेस

बाह्यदर्शन

  1. पुणे विद्यापीठ
  2. दगडूशेठ गणपती मंदिर
  3. सावरकर स्मारक

या सेवेसाठी २ वातानूकुलित बस उपलब्ध असून डेक्कन आणि पुणे रेल्वे स्थानक येथून प्रत्येकी १ बस मार्गस्थ होते.

सदर बस सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी मार्गस्थ होते आणि सायंकाळी अंदाजे ५ वाजेपर्यंत परत येते.

या बस सेवेसाठी प्रति प्रवासी रु. ५००/- भाडे आकारले जाते. डेक्कन व पुणे रेल्वे स्थानक येथील पी.एम.पी.एम.एल. बस थांब्यांवर या बसचे आरक्षण मिळते. तसेच पी.एम.पी.एम.एल. संकेतस्थळावर देखील क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / नेट बँकिंग वापरून आरक्षण करता येते. संकेतस्थळावर आरक्षण केल्यास पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / पारपत्र / वाहन परवाना यातील एक ओळखपत्र प्रवासात सोबत असणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत आरक्षण उपलब्ध असते तर डेक्कन आणि पुणे रेल्वे स्थानक येथे सकाळी ८.३० वाजेपर्यंत आरक्षण करता येते.

जलद बस (बीआरटी) सेवा

[संपादन]

पी.एम.पी.एम.एल. कडून चालविण्यात येणा-या जलद (बीआरटी) बस सेवेस इंद्रधनुष्य (Rainbow) बस सेवा असे नाव देण्यात आले आहे. 

इंद्रधनुष्य जलद (बीआरटी) बस सेवेचे मार्ग:

  1. सांगवी फाटा - रावेत
  2. संगमवाडी - विश्रांतवाडी 
  3. नाशिक फाटा - वाकड 
  4. येरवडा - वाघोली
  5. दापोडी - निगडी (निर्माणाधीन)
  6. काळेवाडी - देहू-आळंदी रस्ता (निर्माणाधीन)
  7. पुणे - मुंबई(निर्माणाधीन)

वातानूकुलित बस सेवा

[संपादन]

वातानूकुलित बस सेवा खालील मार्गांवर उपलब्ध आहे:

१. कात्रज ते निगडी

२. पुणे विमानतळ ते हिंजवडी

संदर्भ

[संपादन]