Jump to content

भुवनेश्वरी देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जन्म - १८४१ - मृत्यू २५ जुलै १९११ [][]

भुवनेश्वरी देवी या स्वामी विवेकानंद यांची माता म्हणून सुपरिचित आहेत.

कुटुंबीय

[संपादन]

भुवनेश्वरी देवी यांचे पती विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अ‍ॅटर्नी होते. भुवनेश्वरी देवी या स्वामी विवेकानंद आणि भूपेंद्रनाथ दत्त या दोन सुविख्यात पुत्रांची माता म्हणून ओळखल्या जातात.[] महेंद्रनाथ दत्त हेही त्यांचे अपत्य.

माता भुवनेश्वरी देवी आणि भगिनी निवेदिता

[संपादन]

भगिनी निवेदिता प्रथम भारतात आल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म, चालीरीती इ.बाबतच्या शिक्षणासाठी भुवनेश्वरी देवी यांच्यापाशी राहावे अशी स्वामी विवेकानंद यांची कल्पना होती, पण ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. मात्र पुढे भूपेंद्रनाथ दत्त स्वदेशी चळवळीच्या निमित्ताने भगिनी निवेदितासोबत कार्य करू लागले तेव्हा ते आवर्जून त्यांना भुवनेश्वरी देवी यांच्या भेटीस घेऊन गेले. त्यानंतर निवेदिता वेळोवेळी त्यांच्याकडे जात असत.[]

भूपेंद्रनाथ यांना सश्रम कारावासाची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी निवेदिता यांना आपल्या मातेची काळजी घेण्यास सांगितले. १९११ मध्ये जेव्हा त्या आजारी पडल्या तेव्हा निवेदिता यांनी शुश्रूषेची सर्व जबाबदारी उचलली. भुवनेश्वरी देवींच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. भूपेंद्रनाथांचे सांत्वन करणारे पत्रही निवेदितांनी लिहिले होते.[]

संदर्भ

[संपादन]
माता भुवनेश्वरी देवी
  1. ^ "Swami Vivekananda". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-03-12.
  2. ^ a b c d वि.वि.पेंडसे (१९६३). विवेकानंद-कन्या भगिनी निवेदिता. पुणे: वि.वि.पेंडसे.