Jump to content

खादर वली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ खादर वली
जन्म खादर वली
प्रोड्डुतुरु, कडप्पा जिल्हा, आंध्र प्रदेश
निवासस्थान मैसूर
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.एस.सी., एम.एस.सी., पी.एच.डी.
प्रशिक्षणसंस्था मैसूर महाविद्यालय, भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू
पेशा डॉ, शास्त्रज्ञ
धर्म मुस्लिम
जोडीदार उषा
अपत्ये डॉ सरला
वडील हुसेनप्पा
आई हुसैनम्मा
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (२०२३)

खादर वली हे एक भारतीय शास्त्रज्ञ आणि आहार व आरोग्य तज्ज्ञ आहेत. ते ‘मिलेट मॅन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. भरड धान्याचे महत्त्व जगाला माहिती देणारे ते शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने भरड धान्याच्या महत्त्वाबाबत अनेक संशोधने केलेली आहेत. भरड धान्याच्या पुनरुज्जीवनासाठी ते २० वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी राळा (फॉक्‍सटेल मिलेट), सावा (बार्नयार्ड मिलेट), कोद्रा (कोडो मिलेट), कुटकी (मिलेट) छोटी कांगनी (बॉउनटॉप मिलेट) ही पाच पॉझिटिव्ह भरड धान्याचे फायदे माहीत करून त्यांचे महत्त्व जगाला सांगितले.[]

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

त्यांचा जन्म हुसैनम्मा आणि हुसेनप्पा यांच्या पोटी प्रोडडुतुर, कडप्पा जिल्हा, आंध्र प्रदेश येथे झाला. म्हैसूरच्या प्रादेशिक कॉलेज ऑफ एज्युकेशनमधून त्यांनी बीएससी (एज्युकेशन) आणि एम.एससी (शिक्षण) चे शिक्षण घेतले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून त्यांनी स्टेरॉईड्समध्ये पीएचडी केली. त्यावेळी त्यांचे वर्गमैत्रीण उषा सोबत प्रेम संबंध जुळून आले आणि त्यांनी लग्न केले. त्यांनी बीव्हर्टन, ओरेगॉन येथे पर्यावरण शास्त्रात पोस्टडॉक्टरल फेलो म्हणून आणि CFTRI येथे शास्त्रज्ञ म्हणून तीन वर्षे घालवली. नंतर त्यांनी एक वर्ष भारतात आणि साडेचार वर्षे अमेरिकेत ड्युपॉन्ट येथे काम केले.[] त्यांनी पदार्थांमधील एजंट ऑरेंज आणि डायऑक्सिन्स सारख्या विषारी रसायनांच्या तटस्थतेवर संशोधन केले. अमेरिकेत संशोधन करत असताना त्यांच्या नजरेस एक सहा वर्षांची मुलगी पडली, जिला मासिक पाळी सुरू झाली होती आणि त्याचा तिला फार त्रास होत होता. डॉ वली यांना या गोष्टीचा फार धक्का बसला. यामागील कारण शोधले असता त्यांना असे दिसून आले की आपण जे खात आहोत ते सर्व आरोग्याच्या दृष्टीने अहितकारक आणि विषारी आहे. जर प्रगत देशाची ही अवस्था असेल तर भारतीय लोकांची काय गत होईल या प्रश्नाने ते बेजार झाले. ते १९९७ मध्ये भारतात परतले आणि म्हैसूरमध्ये स्थायिक झाले कारण त्यांना असे वाटले की अन्नाच्या व्यापारीकरणाच्या पार्श्वभूमीवर परदेशात काम करण्यापेक्षा घरी निरोगी समाजासाठी काम करणे अधिक अर्थपूर्ण आहे. भारतात परत आल्यावर त्यांनी बराच अभ्यास करून भारत भर फिरून विविध भरड धान्याचे बी जमा केले आणि बेंगळुरू येथून शेतकऱ्यांना त्याचे महत्व समजावून सांगून त्यांना प्रोत्साहित केले तसेच त्यांच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला भरड धान्य खाण्यास बाधित केले.[][][]

भरड धान्य वापरण्याच्या प्रक्रियेत त्यांना असे आढळून आले की श्रीधाण्यातील औषधी गुणधर्मामुळे मोठमोठे आजारही कमी होऊ शकतात. म्हणूनच त्यांनी या पाच प्रकारच्या धान्यांना "सिरिधान्यलू" (श्रीधान्य) असे नाव दिले. हे धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सामान्य लोकांचा आशीर्वाद लाभेल आणि हे धान्य खाणाऱ्या लोकांना आरोग्य मिळेल, असे सांगितले जाते. म्हणून त्यांनी त्यांचे नाव सिरिधान्यलू ठेवले.[] तांदूळ, गहू, दूध, मांस, अवेळी अन्न, ट्रान्सजेनिक पिके, रासायनिक खते, कीटकनाशके यामुळे पर्यावरण आणि अन्नात बदल झाले आहेत आणि त्यामुळे जीवघेणे रोग वेगाने होत आहेत, असे त्यांचे मत आहे. शेतकरी वापरत असलेल्या कृत्रिम खतांमुळे संपूर्ण जमीन प्रदूषित होईल आणि कृत्रिम खतांचा वापर केल्यास पुढील ३० वर्षांत जमिनीवर पिके घेता येणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. मुलांमध्ये मधुमेह, लठ्ठपणा, पीसीओडी, ॲनिमिया, कॅन्सर, मासिक पाळी लवकर येणे असे अनेक आजार ते खाल्ल्याने होत असल्याचे ते सांगतात. म्हणूनच ते स्वतः भारतात आले आणि आठ एकर पडीक जमीन विकत घेऊन श्री धान्याची शेती करू लागले. तसेच शेतकऱ्यांना आपल्या कडील बियाणे देऊ लागले. त्यांनी शेती कशी करावी याची माहिती शेतकऱ्यांना दिली. आपण खातो त्या गहू - तांदूळ आणि यांसारख्या इतर धान्यांपेक्षा ही धान्ये अनेक रोगांचे उच्चाटन करण्यास मदत करतात असे त्याला आढळले. भारतातील धोक्यात आलेल्या सिरीच्या धान्यांना त्याचे पूर्वीचे वैभव परत आणण्यासाठी ते भारताच्या अनेक भागांत अथक प्रवास करतात आणि लोकांना सिरी धान्यांच्या महानतेबद्दल माहिती देतात. 20 वर्षांपासून ते लोकांना या धान्यांची माहिती देण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करत आहेत.[]

पुस्तके

[संपादन]
  • आरोग्य सिरी (तेलुगू)[]
  • सिरी धान्यलू (तेलुगू)[]
  • सिरी धान्यलतो संपूर्ण आरोग्यं (तेलुगू)[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "खादर वली". १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  2. ^ p, shilpa (2016-08-14). "Sunday story: Positive grains of truth for a negative age". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2019-01-14 रोजी पाहिले.
  3. ^ "कौन हैं भारत के मिलेट मैन डॉ खादर वली, जो कृषि में ला रहे हैं क्रांति". hindi.news18.com. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  4. ^ "Podcast: Millets— India's age-old super-food". the week. March 26, 2019.
  5. ^ a b "Khader Vali". १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  6. ^ "Arogya Siri - online Telugu Books". www.logili.com (इंग्रजी भाषेत). 2019-01-14 रोजी पाहिले.
  7. ^ "Siri Dhanyalu - online Telugu Books". www.logili.com (इंग्रजी भाषेत). 2019-01-14 रोजी पाहिले.
  8. ^ "Siri Dhanyalatho Sampurna Aarogyam – సిరిధాన్యాలతో సంపూర్ణ ఆరోగ్యం Telugu Book By Dr. Khader Vali – JSN BOOKS – THE LARGEST ONLINE TELUGU BOOK STORE IN ANDHRA PRADESH, INDIA" (इंग्रजी भाषेत). 2019-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-14 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]