कॉफ्स हार्बर आंतरराष्ट्रीय स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॉफ्स हार्बर आंतरराष्ट्रीय मैदान
मैदान माहिती
स्थान कॉफ्स हार्बर, न्यू साउथ वेल्स
आसनक्षमता २०,००० – आसनक्षमता १,०००
मालक कॉफ्स हार्बर सिटी कौन्सिल
प्रचालक कॉफ्स हार्बर स्पोर्ट्स युनिट

शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१७
स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

कॉफ्स हार्बर आंतरराष्ट्रीय मैदान (प्रायोजकत्त्वामुळे सी.एक्स कॉफ्स आंतरराष्ट्रीय मैदान म्हणून ओळखले जाते) हे ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स मधील समुद्रकिनाऱ्यावरील एक शहर कॉफ्स हार्बर येथे वसलेले आहे.

मैदान जून १९९४ मध्ये खुले झाले, आणि स्टॅंड्सची आसनक्षमता फक्त १,००० इतकी असली तरी, मैदानाची प्रेक्षकक्षमता २०,००० इतकी आहे.[१] आजवरची खेळ पाहण्यासाठी आलेली सर्वात मोठी प्रेक्षकसंख्या १२,००० इतकी आहे.[२]

विश्वचषक पात्रता इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक गोल ह्या मैदानावर झाल्याने फिफा विश्वचषकाच्या विक्रमांच्या यादीत मैदानाचे नाव नोंदवले गेले. ११ एप्रिल २००१ रोजी झालेल्या ह्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अमेरिकन सामोआला ३१-० ने हरविले होते.

नॉर्थ कोस्ट फुटबॉलचे ३५ पेक्षा जास्त सामने आणि अंतिम सामने, कॉफ्स हार्बर आंतरराष्ट्रीय मैदानावर झाले खेळवले गेले आहेत.

मैदानावर राष्ट्रीय रग्बी लीगचे सराव सामने नियमित पणे होत असतात. न्यू साउथ वेल्स ब्लूजचा समावेश असलेले आयएनजी चषक सामने मैदानावर याआधी खेळवले गेले आहेत. मागील दोन वर्षांपासून एफ.एफ.ए. राष्ट्रीय युवा चॅंपियनशीपचे सामने येथे भरवले जात आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ बीसीयू आंतरराष्ट्रीय मैदान Archived 2007-09-01 at the Wayback Machine..
  2. ^ मटिल्डाज वॉन्ट अ सी ऑफ गोल्ड, द कॉफ्स कोस्ट ॲडव्होकेट, ६ जून २००७.