Jump to content

शबाना रझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शबाना रझा
उर्फ नेहा बाजपाई
शबाना रझा
जन्म शबाना रझा बाजपाई
१८ एप्रिल, १९७५ (1975-04-18) (वय: ४९)
नांदेड, महाराष्ट्र
इतर नावे नेहा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री, निर्माती
कारकीर्दीचा काळ १९९८ - २००९
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट करीब
पती
अपत्ये आवा
धर्म मुस्लिम

शबाना रझा उर्फ नेहा बाजपाई किंवा निव्वळ नेहा[] या एक हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आहेत.

कारकीर्द

[संपादन]

शबाना रझा यांनी इस १९९८ साली बॉबी देओल सोबत 'करीब' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांचा पुढील चित्रपट 'होगी प्यार की जीत' हा १९९९ साली प्रदर्शित झाला, ज्यात त्यांनी अजय देवगणसोबत प्रमुख भूमिका साकारली. यानंतर फिजा (२०००), राहुल (२००१) आणि आत्मा सह विविध चित्रपटात काम केले. हिंदी व्यतिरिक्त २००१ साली 'अल्ली थंढा वानम' या तामिळ तसेच 'मुस्कान' या कन्नड भाषेतील चित्रपटात देखील त्यांनी काम केले. छोट्याशा विश्रांतीनंतर, त्यांनी 'ॲसिड फॅक्टरी' (२००८) आणि 'अलिबाग' ( २०११) चित्रपटात अभिनय केला. अलिबाग या चित्रपटात त्यांनी आपले मूळ नाव 'शबाना रझा' वापरले. त्यांच्या म्हणण्यानुसार करीब या पहिल्या चित्रपटात त्यांचे 'नेहा' असे त्यांच्या मनाविरुद्ध नामकरण झाले होते.[]

कौटुंबिक पार्श्वभूमी

[संपादन]

रझा यांचा जन्म १८ एप्रिल १९७५ साली महाराष्ट्रातील नांदेड येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. आपला पहिला चित्रपट करीब च्या निर्मिती दरम्यान त्या अभिनेते मनोज बाजपेयी जवळ आल्या आणि मग एप्रिल २००६ मध्ये हे जोडपे विवाहबद्ध झाले.[] या जोडप्याला आवा नायला ही मुलगी आहे.[]

चित्रपट सूची

[संपादन]

अभिनय

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका नोंद
१९९८ करीब नेहा हिंदी चित्रपट
१९९९ होगी प्यार की जीत मेघा सिंह हिंदी चित्रपट
२००० फिजा शहनाझ हिंदी चित्रपट
२००१ एहसास अंतरा पंडित हिंदी चित्रपट
२००१ राहुल मीरा सिंह हिंदी चित्रपट
२००१ अल्ली थंढा वानम मीना तामिळ चित्रपट
२००३ स्माईल कन्नड चित्रपट
२००४ मुस्कान जाह्नवी हिंदी चित्रपट
२००५ कोई मेरे दिल में है आशा हिंदी चित्रपट
२००६ आत्मा नेहा मेहरा हिंदी चित्रपट
२००८ ॲसिड फॅक्टरी नंदिनी संघवी हिंदी चित्रपट
२०११ अलिबाग हिंदी चित्रपट

निर्मिती

[संपादन]
  • मिस्सिंग (हिंदी चित्रपट) - निर्माती (मनोज बाजपाई प्रा. लि.)[]
  • डब्ल्यू.डब्ल्यू.इ. २के२० (WWE 2K20) (व्हिडिओ गेम २०१९) - प्रकल्प व्यवस्थापक (लक्ष्य डिजिटल प्रा. लि.)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Manoj Bajpayee: The Family Man". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 11 June 2021. 20 August 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "I was forced to change my name". www.rediff.com. 2018-10-25 रोजी पाहिले.
  3. ^ "I was just happy being Mrs. Manoj Bajpai: Neha". hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत). 2008-03-05. 2018-10-25 रोजी पाहिले.
  4. ^ "Tabu has done amazing job in Missing, says producer Manoj Bajpayee". Deccan Chronicle. 20 March 2017.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत