Jump to content

अकिरा कुरोसावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हे जपानी नाव असून, आडनाव कुरोसावा असे आहे.

अकिरा कुरोसावा (मराठी लेखनभेद: आकिरा कुरोसावा ; जपानी: 黒澤 明 किंवा 黒沢 明 ; रोमन लिपी: Kurosawa Akira, कुरोसावा अकिरा;) (मार्च २३, इ.स. १९१०; टोक्यो, जपान - सप्टेंबर ६, इ.स. १९९८; तोक्यो, जपान) हा जपानी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक होता. सुमारे ५७ वर्षांची प्रदीर्घ चित्रपट-कारकीर्द पाहिलेल्या कुरोसावा यांनी ३० चित्रपट दिग्दर्शिले.

कुरोसावा यांनी चित्रकार म्हणून काही काळ व्यावसायिक कामे केल्यानंतर इ.स. १९३६ साली जपानी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आरंभी पटकथालेखक व सहायक दिग्दर्शकाची कामे केल्यानंतर त्याने दुसऱ्या महायुद्धकाळात इ.स. १९४३ साली सुगाता सान्शिरो चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले.

चित्रपट दिग्दर्शन

[संपादन]
वर्ष (इ.स.) नाव जपानी रोमनीकरण
१९४३ सुगाता सान्शिरो 姿三四郎 Sugata Sanshirō
१९४४ इचिबान उत्सुकुशिकु 一番美しく Ichiban utsukushiku
१९४५ जोकु सुगाता सन्शिरो 續姿三四郎 Zoku Sugata Sanshirô
तोरा नो ओ वो फुमा ओतोकोताशी 虎の尾を踏む男達 Tora no o wo fumu otokotachi
१९४६ वागा सेशुन नि कुइनाशि わが青春に悔なし Waga seishun ni kuinashi
सुबाराशिकि निशियोबि 素晴らしき日曜日 Subarashiki nichiyôbi
१९४८ योइदोरे तेन्शि 酔いどれ天使 Yoidore Tenshi
१९४९ शिउकानारु केत्तो 静かなる決闘 Shizukanaru ketto
नोरा इनु 野良犬 Nora inu
१९५० सुक्यन्दारु 醜聞 Sukyandaru
वा Shūbun
रशोमोन 羅生門 Rashōmon
१९५१ हाकुचि 白痴 Hakuchi
१९५२ इकिरु 生きる Ikiru
१९५४ शिचिनिन नो सामुराइ 七人の侍 Shichinin no samurai
१९५५ इकिमोनो नो किरोकु' 生きものの記録 Ikimono no kiroku
१९५७ कुमोनोसु जो 蜘蛛巣城 Kumonosu-jō
दोन्जोको どん底 Donzoko
१९५८ काकुशि तोरिदे नो सान अकुनिन 隠し砦の三悪人 Kakushi toride no san akunin
१९६० वरुइ यात्सु होदो योकु नेमुरु 悪い奴ほどよく眠る Warui yatsu hodo yoku nemuru
१९६१ योजिन्बो' 用心棒 Yōjinbō
१९६२ शुबाकि साञ्जुरो 椿三十郎 Tsubaki Sanjūrō
१९६३ तेङ्गोकु तो जिगोकु 天国と地獄 Tengoku to jigoku
१९६५ अकिहिगे 赤ひげ Akahige
१९७० दोदेसुकादेन どですかでん Dodesukaden
१९७५ देरुसु उजारा デルス・ウザーラ Derusu Uzāra
१९८० कागेमुशा 影武者 Kagemusha
१९८५ रान Ran
१९९० युमे Yume
१९९१ हाचिगात्सु नो रापुसोदि 八月の狂詩曲 Hachigatsu no rapusodī
वा Hachigatsu no kyōshikyoku
१९९३ मादादयो
まあだだよ Mādadayo

बाह्य दुवे

[संपादन]