Jump to content

सोनाली पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सोनाली पाटील ही एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. सोनाली सध्या बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी झाली आहे.

सोनाली पाटील
जन्म ५ मे, १९८७ (1987-05-05) (वय: ३७)
लातूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम वैजू नं.१
देवमाणूस
बिग बॉस मराठी ३

वैयक्तिक जीवन

[संपादन]

सोनाली पाटील मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री. सोनालीचा जन्म ५ मे रोजी महाराष्ट्रातील लातूर येथे झाला. ती मूळची कोल्हापूर, महाराष्ट्रातील आहे. सोनालीला फेमस टिकटॉक गर्ल म्हणून ओळखले जाते.

तिने आपले शालेय शिक्षण ताराराणी विद्यापीठ, उषाराजे हायस्कूलमधून केले. तिने आपले महाविद्यालय कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून पूर्ण केले. तिच्याकडे M.A. आणि B.Ed पदवी आहेत. ती पेशाने शिक्षिका आहे. तिने वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले आहे.

मालिका

[संपादन]
वर्ष मालिका भूमिका संदर्भ
२०१९ जुळता जुळता जुळतंय की रेखा
२०२० वैजू नं.१ वैजयंती (वैजू) []
२०२१ देवमाणूस ॲ. आर्या देशमुख []
२०२१ बिग बॉस मराठी ३ स्पर्धक []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'Julta Julta Jultay Ki' fame Sonali Patil to play the lead in upcoming show 'Vaiju Number 1" - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-09-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Vaiju No.1 fame Sonali Patil to feature in Devmanus soon - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-09-30 रोजी पाहिले.
  3. ^ "Bigg Boss Marathi 3 contestant Sonali Patil: From starting her career as a lecturer to entering in the Marathi industry, all you should know about the actress - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-09-30 रोजी पाहिले.