Jump to content

नेत्रा कुमानन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेत्रा कुमानन
नेत्रा कुमानन
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान चेन्नई
जन्मदिनांक ३१ ऑगस्ट, १९९७ (1997-08-31) (वय: २७)
उंची ५ फूट ३ इंच
खेळ
देश भारत
खेळ नौकानयन
खेळांतर्गत प्रकार लेसर रेडीयल
प्रशिक्षक टामस इस्झेस, हंगेरी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०२० उन्हाळी तोक्यो, जपान


नेत्रा कुमानन (३१ ऑगस्ट १९९७)[] ही एक भारतीय नौकानयनपटू आहे. ती भारतातील चेन्नई येथे राहते.[] एप्रिल २०२१ मध्ये ओमान येथे झालेल्या स्पर्धेत नौकानयनातील लेसर रॅडीयल प्रकारात तिने विश्वचषक पदक जिंकले. त्यामुळे ती तोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.[]

कारकीर्द

[संपादन]

नेत्राने २०१४ आणि २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २०१८ मध्ये इंडोनेशियातील जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ती चौथी आली होती.[]

२०२० साली मायामी, अमेरिका येथे झालेल्या नौकानयन विश्वचषक स्पर्धेत नेत्राने कांस्यपदक मिळवले.[] नौकानयनात विश्वचषक पदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला आहे. तसेच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारीही ती पहिली भारतीय महिला नौकानयनपटू आहे.[]

हंगेरीचे टामस इस्झेस हे तिचे प्रशिक्षक आहेत.[] २०१९ मध्ये तिने स्पेनमधील ग्रॅन कॅनेरीया येथे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.[]

शिक्षण

[संपादन]

ती एसआरएम युनिव्हर्सिटी, वडापलानी कॅम्पसमध्ये बीटेक-मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी

[संपादन]

नेत्राच्या वडलांची सॉफ्टवेर कंपनी आहे. नेत्राच्या नौकानयनातील कारकिर्दीला तिच्या आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले आहे.[] नेत्राचा भाऊ, नवीन राष्ट्रीय पातळीवरील नौकानयन स्पर्धांमध्ये सहभागी होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d "Sailing KUMANAN Nethra - Tokyo 2020 Olympics" Check |url= value (सहाय्य). .. (इंग्रजी भाषेत). 2021-07-15 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ Apr 7, PTI /; 2021; Ist, 21:20. "Nethra Kumanan becomes first Indian woman sailor to qualify for Olympics | Tokyo Olympics News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-07-15 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ "Who is Nethra Kumanan". Olympics.com. 2021-07-15 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Who Is Nethra Kumanan". https://www.outlookindia.com/. 2021-07-15 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  5. ^ a b Apr 9, PTI / Updated:; 2021; Ist, 13:26. "From tennis and dancing to sailing, Nethra Kumanan's journey to Olympics | More sports News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-07-15 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)