Jump to content

तमिळ विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तामिळ विकिपीडिया
तामिळ विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा तमिळ
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://ta.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण सप्टेंबर, इ.स. २००३
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

तामिळ विकिपीडिया (तमिळ: தமிழ் விக்கிப்பீடியா) ही विकिपीडियाची तामिळ भाषेतील आवृत्ती आहे, जी विकिमीडिया फाउंडेशनद्वारे चालविली जाते.[] याची स्थापना सप्टेंबर २००३ मध्ये झाली आणि मार्च २०१७ मध्ये या ज्ञानकोशाने ९१,००० लेखांचा टप्पा ओलांडला. १ जुलै २०२० पर्यंत, तामिळ विकिपीडिया हा ६१व्या क्रमांकाचा विकिपीडिया आहे आणि लेख संख्येनुसार भारतीय भाषांमध्ये (हिंदी विकिपीडिया नंतर) दुसरा सर्वात मोठा विकिपीडिया आहे. [१] हे द्रविड मूळच्या १०,०००हून अधिक लेखांचे पहिले विकिपीडिया देखील आहे. हा प्रकल्प दक्षिण आशियाई भाषेच्या विकिपीडियाच्या विविध गुणवत्तेच्या मापांमधील अग्रगण्य विकिपीडियांपैकी आहे.[] मार्च २०१७ पर्यंत यात ९१,६१० पेक्षा जास्त लेख आणि १,०९,६९१ नोंदणीकृत वापरकर्ते होते.[] मे २०१७ मध्ये या विकिपीडियाने १,००,००० लेखांचा टप्पा ओलांडला.[]

सांस्कृतिक महत्त्व

[संपादन]

पाश्चात्य देशांमधील विकिपीडियावरील सामान्य शैक्षणिक टीकाच्या विपरीत, तामिळ विकिपीडियाला इंटरनेटवरील तमिळ भाषेमधील माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो. मोठ्या विकिपीडिया प्रकल्पांच्या तुलनेत ज्ञानकोशात फारच कमी प्रमाणात कलाविध्वंसन केले जाते, मुख्यत: तमिळनाडू आणि श्रीलंकाच्या ग्रामीण भागात संगणक किंवा इंटरनेट सेवा नसल्यामुळे या प्रकल्पाची गती मंदावली आहे. या प्रकल्पाचा बहुतांश विकास हा विदेशातील तामिळ देशांतरित लिकांकडून होतो.[]

एप्रिल २०१० मध्ये, तामिळ इंटरनेट कॉन्फरन्सने तामिळ विकिपीडियावरील मजकूर वाढविण्यासाठी, तामिळनाडू, भारतभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित केली.[] जागतिक शास्त्रीय तामिळ परिषद २०१० (या भाषेच्या आधुनिक विकासाबद्दल चर्चा करणारे जगभरातील तमिळ अभ्यासकांची बैठक)च्या संदर्भात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. २०००हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला, या स्पर्धेची सांगता तामिळ विकिपीडियावरील विविध विषयांवरील शैक्षणिकदृष्ट्या १,२०० नवीन लेखांच्या निर्मितीची झाली.[]

सप्टेंबर २०१३ मध्ये, तामिळ विकिपीडियाने आपला दहावा वर्धापन दिन साजरा केला.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "The Tamil Wiki…six years on". The Hindu. Chennai, India. May 21, 2009. 2009-05-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 26, 2009 रोजी पाहिले.
  2. ^ stats:EN/TablesWikipediaTA.htm
  3. ^ "List of Wikipedias". meta.wikimedia.org. 2016-08-28 रोजी पाहिले.
  4. ^ of Wikipedias
  5. ^ The Photologue of the Tamil Wikipedia Academy | kiruba.com
  6. ^ "Move for more Tamil content in Wikipedia". The Hindu. Chennai, India. April 1, 2010. 2010-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-04-05 रोजी पाहिले.
  7. ^ Madhavan, Karthik (15 June 2010). "1,200 articles selected to Tamil Wikipedia upload". The Hindu. Chennai, India.
  8. ^ Subramaniam, Karhtik. "Tamil Wikipedia to celebrate 10 years". The Hindu. 13 November 2013 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]