आंतेरु द क्यँताल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(१८ एप्रिल १८४२–११ सप्टेंबर १८९१). एक श्रेष्ठ पोर्तुगीज कवी व तात्त्विक प्रवृत्तीचा गद्यलेखक. जन्म अझोर्समधील पाँता देल्गादा ह्या शहरी. १८६४ मध्ये त्याने कोईंब्रा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. सोनेतुश (इं. शी. सॉनेट्स) हा पहिला सुनीत संग्रह १८६१ मध्ये प्रसिद्ध झाला.