राजकीय पक्ष
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्राची राजकीय सत्ता प्राप्त करून घेऊन ती वापरण्याच्या उद्देशाने संघटित झालेल्या राष्ट्रातील नागरिकांचा समुदाय होय. [१]
ही निवडणुकांच्या आधारे सरकारमध्ये स्थान किंवा सत्ता मिळवू इच्छिणारी राजकीय संघटना असते.
भारतात सुमारे २०४४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. कॉंंग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय कॉंंग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्याताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.
मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.
२०१८ साली,
- देशातील ४०४ पक्षांच्या नावात 'भारत किंवा भारतीय' हे शब्द आहेत.
- देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द आहे.
- देशातील १३२ पक्षांच्या नावात 'जनता किंवा प्रजा' हे शब्द आहेत.
- देशातील ९८ पक्षांच्या नावात 'विकास' हा शब्द आहे.
- देशातील ८७ पक्षांच्या नावात 'क्रांती किंवा क्रांतिकारी' हे शब्द आहेत.
- देशातील ५७ पक्षांच्या नावात 'आम किंवा युवा' हे शब्द आहेत.
- देशातील १२ पक्षांच्या नावात 'गांधी' हा शब्द आहे.
- देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, काँग्रेस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द आहे.
- देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत आहेत.
- उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष आहेत, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
- दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहे; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लोकांमागे एक पक्ष.
- बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहे, त्या राज्यात १२० पक्ष आहेत.
- तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
- ४.९ कोटी लोकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष आहेत.
वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाराष्ट्रात "प्रस्थापित" विरुद्ध "वंचित बहुजन समाज" असा आहे. जनता तेच ते घराणेशाहीचे नेते पुन्हा पुन्हा येत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवत नाहित.उलट कारखानदारी, बँका, सोसायट्या यामध्ये प्रामुख्याने त्यांचा समावेश आहे. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेकरांनी तमाम भारतीयांना मताचा अधिकार दिला. आणि त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वखालील सर्व वंचित समूह,जाती पंत, अल्पसंख्य गट यांचा वंचित बहुजन आघाडी नावाने एकत्र येऊन युतीने वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाज, बरिस्टार ओवेसी यांची एम आय एम पक्ष यांची युती असून प्रत्येक सभेत भरभरून प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्रात 2 कोटी मतदान घेईल.
तर महाराष्ट्रत 15 मतदारसंघात विजय ही मिळवण्याची शक्यता आहे ।
प्रामुख्याने सोलापूर, अकोला, औरंगाबाद, सांगली, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, माळेगाव, हिंगोळी, जालना, धुळे, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती, रामटेक, या जागांवर वंचित बहूजन आघाडीचे प्राबल्य आहे । तरी येत्या काळात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र मध्ये वेगळा ठसा उमटवणार .
महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष :
[संपादन]राजकीय पक्ष आणि देणग्या:
[संपादन]- राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचे स्रोत नेमके कोणते ? Archived 2020-12-04 at the Wayback Machine.
माहितीचा स्रोत
[संपादन]- https://eci.gov.in/ निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ.
संदर्भ
[संपादन]- ^ "राजकीय पक्ष". vishwakosh.marathi.gov.in (Marathi भाषेत). 31 October 2022. 31 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)