दत्ता भगत
दत्तात्रय गणपतराव भगत | |
---|---|
चित्र:Dattabhagat.jpg | |
जन्म |
१३ जून, १९४५ वाघी, ता. जि. नांदेड |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | लेखन, संशोधन, वक्ते, साहित्यिक, विचारवंत |
भाषा | मराठी |
प्रभाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले |
प्रभावित | प्रल्हाद लुलेकर |
वडील | गणपतराव भगत |
आई | जळूबाई मानेजी मोरे (माहेरचे नाव) |
पत्नी | सुमन कचराबाई गंगाधरराव येरेकार (माहेरचे नाव) |
पुरस्कार | महाराष्ट्र राज्य : लेखन पुरस्कार (पाच),'आदर्श शिक्षक पुरस्कार' महाराष्ट्र शासन १९९६,'दलित मित्र' पुरस्कार महाराष्ट्र शासन २००० |
प्रा. दत्ता गणपतराव भगत (१३ जून इ.स. १९४५) हे मराठी लेखक, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक व व्याख्याते आहेत. त्यांनी सन १९७० मध्ये एम.ए. मराठी पीपल्स कॉलेज, नांदेड येथून सर्व प्रथम श्रेणीत प्राप्त केली असून अधिव्याख्याते मराठी विभाग प्रमुख म्हणून पद भुषवले आहे.
कारकीर्द
[संपादन]प्रा.दत्ता भगत यांना विविध स्तरावरील अध्यापनाचा एकूण अनुभव १९६३ ते २००५ (४३ वर्षे) आहे.
माध्यमिक शिक्षक
- श्री. शारदाभवन हायस्कूल, नांदेड(इ.स. १९६२-१९६३)
- पीपल्स हायस्कूल, नांदेड(इ.स. १९६३-१९७०)
अधिव्याख्याता
- पदव्युत्तर विभाग, पीपल्स कॉलेज, नांदेड. -जून १९७० – जून १९९७
- प्राध्यापक, मराठी विभाग (सेवानिवृत्त), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद -डिसे. १९९७ – जून २००५
मराठी विभाग प्रमुख
- पीपल्स कॉलेज, नांदेड (१९८८ – १९९७ )
उपप्राचार्य
- पीपल्स कॉलेज, नांदेड (१९९१ – १९९५ )
प्राचार्य
- सन १९९४ ते १९९६ पीपल्स कॉलेज,नांदेड
संचालक, विद्यार्थी कल्याण
- स्वामी रामानंद्तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (जुलै १९९७ – नोव्हें. १९९७ )
प्रपाठक, मराठी विभाग
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद औरंगाबाद (डिसें. १९९७ – जुलै १९९८ )
प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (जुलै १९९८ – जुलै २००५ )
एमेरिटस् प्रोफेसर
- नोव्हें. २००९
अध्यापनाचा विशेष अनुभव
- अमराठी भाषकांसाठी मराठी भाषेचे अध्यापन
- भाषा संचनालय महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित – १९६९ – १९७०
प्रकाशित लेखन व साहित्य
[संपादन]अ.क्र | पुस्तकाचे नाव | प्रकाशन वर्ष | प्रकाशन तथा विशेष |
---|---|---|---|
१ | होळी (कथा) | १९७३ | प्रौढ साक्षर विभाग, महा. शासन |
२ | बौद्ध पूजा पाठ विधी | १९७३ | भारतीय बौद्ध महासभा, नांदेड |
३ | कायापालट (कथा) | १९७४ | प्रौढ साक्षर विभाग, महा. शासन |
४ | आवर्त आणि इतर एकांकिका | १९७८ | शारदा प्रकाशन, नांदेड[१] |
५ | चक्रव्यूह आणि इतर एकांकिका | १९८० | शारदा प्रकाशन, नांदेड |
६ | जहाज फुटलं आहे आणि इतर एकांकिका | १९८२ | निर्मल प्रकाशन, नांदेड |
७ | अश्मक (नाटक) | १९८५ | संबोधि प्रकाशन, मुंबई [२] |
८ | खेळिया (नाटक) | १९८६ | कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे |
९ | वाटा पळवाटा (नाटक) | १९८६ | कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे |
१० | दलित साहित्यः दिशा आणि दिशांतर | १९९२ | अभय प्रकाशन, नांदेड |
११ | दलित साहित्यः वाङमयीन प्रवाह | १९९३ | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक |
१२ | नरहर कुरुंदकरांच्या लेखनाची सूची | १९९४ | संगत प्रकाशन, नांदेड |
१३ | निवडक एकांकिका | १९९६ | अभय प्रकाशन नांदेड [३] |
१४ | विजयी विश्व तिरंगा प्यारा (वैचारिक) | २००१ | शांभवी प्रकाशन, औरंगाबाद |
१५ | निळी वाटचाल (समीक्षा) | २००१ | प्रतिमा प्रकाशन, पुणे [४] |
१६ | नाटकः एक वांङ्मय प्रकार (समीक्षा | २००२ | यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक |
१७ | राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर | २००३ | मॅकमिलन प्रकाशन, पुणे |
१८ | आधुनिक मराठी वांङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी | २००५ | चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद |
१९ | गोष्ट गोधराजाची (मुलांसाठी नाटिका) | २००५ | साकेत प्रकाशन औरंगाबाद |
२० | मंडल आयोग, गैरसमज आणि आक्षेप | २००७ | चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद |
२१ | शोध पायवाटांचा (ललित लेख) | २००८ | सुविद्या प्रकाशन, पुणे |
२२ | पिंपळपानांची सळसळ (ललित लेख) | २०१० | स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद[५] |
२३ | समकालीन साहित्य आणि साहित्यिक (समीक्षा) | २०१० | रजत प्रकाशन, औरंगाबाद[६] |
२४ | मराठी दलित एकांकिका | २०१२ | साहित्य अकादमी [७] |
२५ | गोष्टी बिसापाच्या | २०१३ | स्पर्श प्रकाशन, पुणे |
२६ | साहित्य समजून घेतांना | २०१४ | मीरा प्रकाशन, औरंगाबाद[८] |
२७ | विजय तेंडूलकर: व्यक्ती आणि कार्य | २०१५ | साहित्य अकादमी [९], |
२८ | पुस्तकी वांझ चर्चा (नाटक) | २०१९ | इसाप पब्लिकेशन, नांदेड |
२९ | मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास (आरंभापासून १९९० पर्यंत) | २०२० | महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महा. राज्य |
दत्ता भगत यांनी केलेले मराठी अनुवाद
[संपादन]- सात शिखरे (काश्मिरी कथा) – अख्तर मोहियोद्दीन – साहित्य अकादमी
- कलंकी (नाटक) – डॉ. लक्ष्मीनारायण लाल
- म्युलॅटो (नाटक) – लँग्स्टन ह्युजेस
दत्ता भगत यांच्या लेखनाचा वेध घेणारी पुस्तके
[संपादन]क्र. | पुस्तकाचे नाव . | लेखकाचे नाव . | प्रकाशक | वर्ष |
१ | दत्ता भगत यांचे नाट्य विश्व | डॉ. रमेश जनबंधू | महाबोधी सिद्धार्थ प्रकाशन, नागपूर | १९९२ |
२ | दत्ता भगत यांची नाटके | प्रा. शैलेश त्रिभुवन | पॉपिलॉन पब्लिशिंग हाउस, पुणे | २००१ |
३ | वाटा पळवाटा – कलन आणि आकलन | संपा. मधुकर राहेगावकर | कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद | २००४ |
४ | जातक (गौरवग्रंथ) | संपा. प्रल्हाद लुलेकर | कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद | २००५ |
५ | दलित नाटक आणि दत्ता भगत यांचे नाट्य विश्व | प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ | कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद | २००९ |
संपादन / सहसंपादन
[संपादन]क्र. | संपादन / सहसंपादन | प्रकाशक | वर्ष |
१ | स्वामी रामानंद तीर्थ (श्रद्धांजली) विशेषांक | पीपल्स कॉलेज, नांदेड | १९७३ |
२ | नरहर कुरुंदकर स्मृती विशेषांक (श्रद्धांजली विशेषांक) | पीपल्स कॉलेज नांदेड | १९८२ |
३ | नांदेड: एक शोध | नांदेड जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड | १९८६ |
४ | कुमार भारती (क्रमिक पुस्तक - इ. अकरावीसाठी) | महा. राज्य उच्च शिक्षण मंडळ, पुणे | १९९४ – १९९७ |
५ | परिवर्तन: संकल्पना, वेध आणि वास्तव (कुलगुरू डॉ. जे. एम. वाघमारे गौरवग्रंथ) | कल्पना प्रकाशन, नांदेड | १९९९९ |
६ | श्री. शिवप्रभू चरित्र (सभासद बखर) | प्रतिमा प्रकाशन, पुणे | २००१ |
७ | तृतीय रत्न – ज्योतिबा फुले (मराठी भाषेतील पहिले नाटक) | शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर | २००१ |
विशेष संपादन
[संपादन]नरहर कुरुंदकर साहित्यः इंद्रायणी प्रकाशन, पुणे
- अभयारण्य
- अन्वय
- वारसा
- परिचय
- अभिवादन
- वाटचाल
- रंग-विमर्श
- व्यासांचे शिल्प
- त्रिवेणी
- रस-सूत्र
- नरहर कुरुंदकरांच्या प्रस्तावना
- थेंब अत्तराचे
दत्ता भगत यांच्या लेखनाचे अनुवाद
[संपादन]क्र. | मूळ लेखन | अनुवादाची भाषा | अनुवादित नाव | अनुवादक |
१ | वाटा पळवाटा | इंग्रजी | Routes and Escape Routes | डॉ. माया पंडित |
२ | तेलुगू | ---- | श्रीमती. राव | |
३ | कन्नड | ---- | श्रीमती. देऊळगावकर | |
४ | हिंदी | रास्ते चोर रास्ते | प्रा. त्र्यंबक महाजन | |
५ | आवर्त | हिंदी | आवर्त
आवर्त |
वसंत देव, मुंबई;
प्राचार्य जगताप, औरंगाबाद |
६ | इंग्रजी | Whirlpool | डॉ. एलनार झेलीएट, यु.एस.ए. | |
७ | अश्मक | इंग्रजी | Ashmak | डॉ. डी. एम. शेंडे, नागपूर |
९ | हिंदी | अश्मक | डॉ. सुर्यनारायण रणसुभे | |
१० | जहाज फुटलं आहे | उर्दू | जहाज फुटा है | जमील अहमद |
आगामी पुस्तके
[संपादन]- प्रश्नायण (ललित लेख) – निर्मल प्रकाशन, नांदेड
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय कार्याची कालिकसुची: १८९८ ते १ मे १९६०
- आधारवेल – (मातोश्री रमाई आणि बाबासाहेब यांच्या सहजीवानावरील नाटक) – निर्मल प्रकाशन, नांदेड
- भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान (डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
सहभाग
[संपादन]साहित्य अकादमी, मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमी, झारखंड आदिवासी रंगमंच आखाडा, विविध विद्यापीठीय मराठी अभ्यास मंडळे इ. संस्थांनी आयोजित केलेल्या परिसंवादात सहभाग याशिवाय पन्नास समीक्षा लेख आणि पन्नास पुस्तकांच्या प्रस्तावना इ.
विद्यापीठ कारकीर्द
[संपादन]- कुलपतींचे प्रतिनिधी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९६ ते २००१
- संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ऑगस्ट १९९७ ते नोव्हें. १९९७
- अध्यक्ष, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९५ ते डिसें. १९९७
- सदस्य, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
- विषय तज्ज्ञ, संपादक मंडळ महा. राज्य उ. माध्य. मंडळ कुमारभारती (१० वी) २००७
- सदस्य, अॅकॅडमिक कौन्सिल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.
- सदस्य, प्राध्यापक निवड समिती तज्ज्ञ अथवा कुलगुरूंचे प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
- सदस्य संलग्नीकरण समिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ / डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
- सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार मंडळ, मराठवाडा विद्यापीठ / स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
- सदस्य, प्रौढ साक्षरता सल्लागार मंडळ, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
- कस्टोडीयन नांदेड जिल्हा परीक्षा मुल्यांकन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद / स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
- सदस्य बहिःशाल शिक्षण मंडळ मराठवाडा विद्यापीठ / स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
- सदस्य ग्रंथालय सल्लागार मंडळ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९६ ते २००१
- मुख्य संपादक 'ज्ञानतीर्थ' स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९५ ते १९९७
- संयोजक मराठी विषयाच्या प्राध्यापकांचे उद्बोधन वर्ग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड १९९७. स्टाफ अकादमी कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद १९९९ – २००१
- मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद द्वारा आयोजित चर्चासत्रांचे संयोजक – कवितेची कार्यशाळा २४, २५ जाने. २०००
- सदस्य. रा. से. यो. बुलेटीन, संपादक मंडळ मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद १९८०
सन्मान व पुरस्कार
[संपादन]- महाराष्ट्र राज्य लेखन निर्मिती पुरस्कार विविध वाङ्मय प्रकारात ५ पुरस्कार (आवर्त आणि इतर एकांकिका, जहाज फुटलं आहे आणि इतर एकांकिका, निळी वाटचाल, वाटा-पळवाटा)
- नाट्यदर्पण पुरस्कार मुंबई १९७८
- कै. लोटू पाटील पुरस्कार म.सा.प. औरंगाबाद
- महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, दिग्दर्शनासाठी विभागीय पातळीवर दुसरा पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य कामगार नाट्य स्पर्धा विभागीय पातळीवर दुसरा पुरस्कार
- प्रतिक थिएटर, वाई, नाट्य लेखन पुरस्कार
- दलित साहित्याचे अभ्यासक यासाठी डॉ. भालचंद्र फडके ग्रंथकार पुरस्कार म.सा.प. पुणे २००२
- 'आदर्श शिक्षक पुरस्कार' नांदेड, नगरपरिषद, नांदेड
- 'आदर्श शिक्षक पुरस्कार' महाराष्ट्र शासन १९९६
- 'दलित मित्र' पुरस्कार महाराष्ट्र शासन २०००
- शालेय पातळीवर 'जहाज फुटलं आहे' या एकांकिकेचा आणि महाविद्यालीन पातळीवर 'अश्मक', 'खेळिया' आणि 'वाटा-पळवाटा' या पुस्तकांचा मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठ (मुक्त विद्यापीठ) या सर्व विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश
- 'दलित साहित्यः दिशा आणि दिशांतर', 'सभासद बखर'. 'तृतीय रत्न' 'आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी' इ. पुस्तकांचा विद्यापीठ पातळीवरील अभ्यासक्रमात समावेश
- 'वाटा-पळवाटा' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद आशिया खंडातील निवडक नाटक या मालेत डॉ. एरीन बी. मी. संपादित 'Drama Contemporary India' या ग्रंथात समावेश. ग्रंथ अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स संस्थेतर्फे प्रसिद्ध
- 'आवर्त' या एकांकिकेचा इंग्रजी अनुवाद साहित्य अकादमी द्वारा प्रकाशित 'स्वातंत्र्योत्तर भारतीय साहित्य' या ग्रंथात समाविष्ट
- 'वाटा पळवाटा' या नाटकाचे दूरदर्शनवरील सर्व वाहिन्यांवरून प्रक्षेपण
- 'आवर्त' या दीर्घांकाचा जागतिक विदुषी एलीनार झेलीयट यांनी अनुवाद केला. व्हिएन्ना विद्यापीठात डेझर्टेशन सादर
- 'वाटा पळवाटा' या विषयावर लंडन स्थित स्मिथ नावाच्या विद्यार्थ्याचे श्री. सतीश आळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डेझर्टेशन सादर
- तिसऱ्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अंबेजोगाई येथे अध्यक्षपद (१९८६)
- महाराष्ट्र शासनाच्या लेखन पुरस्कार समितीचे सदस्य १९८६-८७, १९९८-९९ आणि १९९९-२०००
- महाराष्ट्र शासनाच्या प्रयोगपूर्व परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य
- साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार मंडळ सदस्य १९९७-२००२
- विभागीय सल्लागार समिती एल.आय.सी. मुंबई झोन, मुंबई १९८६-१९८९ सदस्य
- तज्ञ परीक्षक नवलेखक अनुदान योजना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ १९८६ ते १९८८
- थिएटर अकादमी पुणे आयोजित नाट्य लेखन कार्यशाळेसाठी निवड १९८५, १९८६,
- कुलापतीचे प्रतिनिधी या नात्याने स्वा. रा. ती. म. विद्यापीठ नांदेडसाठी पाच वर्ष नियुक्ती
- नागपूर, सोलापूर, चंद्रपूर इ ठिकाणी कार्यरत असणाऱ्या दलित रंगभूमीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी व संस्थांनी जाहीर सत्कार करून 'वाटा पळवाटा' सादर केले.
- विनायकराव चारठाणकर सेलू (जिल्हा परभणी) लेखन गौरव पुरस्कार २००२
- संविधान गौरव युवा प्रबोधन मंच, नांदेड. सन्मान पुरस्कार २६ जाने. २००२
- समता प्रतिष्ठान, नांदेड, समाज गौरव पुरस्कार 'समाजरत्न' १४ एप्रिल २००३
- महाराष्ट्र फौंडेशन मुंबई. विशेष पुरस्कार २००३ (दलित साहित्य लेखन)
- 'नांदेड भूषण' मातोश्री ठाकरे प्रतिष्ठान, नांदेड २००६
- मराठवाडा मित्र मंडळ, मुंबई लेखन गौरव पुरस्कार २००७
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला प्रबोधिनी / संबोधि अमरावती: सपत्निक सत्कार १७-०२-२००८
- लोकमत गौरव पुरस्कार औरंगाबाद २००८
- अध्यक्ष आंबेडकरी साहित्य संमेलन, नागपूर मार्च २०१६
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा 'जीवन साधना गौरव पुरस्कार २० सप्टे. २०१७
- दत्ता भगत यांच्या एकांकिका, नाटकांचे हौशी रंगभूमीवर नियमित प्रयोग
- पं. सत्यदेव दुबे यांच्या ग्रुपतर्फे डॉ. वसंत देव द्वारे हिंदी अनुवादित 'आवर्त'चे प्रयोग
- डॉ. श्रीराम लागू यांच्या 'वाचिक अभिनय' ह्या पुस्तकात भाषिक सामर्थ्याचा उल्लेख म्हणून दत्ता भगत यांच्या नाटकातील उताऱ्याचा समावेश
- 'इप्टा' रायपूर मध्यप्रदेश या संस्थेद्वारे प्रा. दत्ता भगत यांच्या 'जहाज फुटलं आहे' ह्या एकांकिकेचे नुक्कडवर २५० प्रयोग.
- कुरुंदकर जीवन गौरव पुरस्कार, जिल्हा परिषद नांदेड, २०१३
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार : द्वारा मारवाडी फाऊंडेशन, नागपूर, पाच लक्ष रुपये आणि पानचिन्ह २०१७.[१०]
- पांपटवार जन्मशताब्दी साहित्य पुरस्कार, नांदेड, २०१९
- महाराष्ट्र शासनातर्फे 'नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार -२०२१
भूषवलेली पद व माहिती
[संपादन]- १९७४ पहिली कथा प्रकाशित
- १९८२-८७ अध्यक्ष, नरहर कुरुंदकर ग्रंथालय, नांदेड
- १९८६ अध्यक्ष, ३ रे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, अंबेजोगाई, १९८६
- १९९५-९७ प्राचार्य, पीपल्स कॉलेज, नांदेड
- १९९५-९७ मुख्य संपादक ज्ञानतीर्थ (स्वा. रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड)
- अध्यक्ष, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ (स्वा. रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड)
- १९९६ – २००१ कुलपतींचे प्रतिनिधी, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
- १९९७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे प्रपाठक म्हणून रुजू
- १९९७ – २००२ साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार मंडळ सदस्य
- भालचंद्र फडके ग्रंथाकर गौरव पुरस्कार – महा. साहित्य परिषद, पुणे
- २००५ सेवानिवृत्त प्राध्यापक/ विभाग प्रमुख – मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
- २००६ अध्यक्ष, ८६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, नांदेड
- २००८ – २००९ सदस्य सचिव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणे व लेखन प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन
- २००९ सदस्य – मराठी विश्वकोश समिती
- २०१० उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण
- २०१० ते आजतागायत अध्यक्ष, नरहर कुरुंदकर अभ्यास केंद्र, नांदेड
- २०१९ अध्यक्ष, बौद्ध साहित्य संमेलन, सोनपेठ, जिल्हा परभणी (८ डिसेंबर)
- १९९० पश्चात मराठी नाटक संरचना आणि चर्चा (१/७/२०२२).साहित्य अकादमी पुरस्कृत, श्रीरामपूर.
अध्यक्षीय बीज भाषण.( वाचन - दत्ता पाटील)
आजीव सदस्य
[संपादन]- नांदेड एज्यूकेशन सोसा. नांदेड
- नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान, नांदेड
- मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
- पद्मश्री गोविंदभाई प्रतिष्ठान, औरंगाबाद
- जीवन विकास ग्रंथालय, औरंगाबाद
- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
- अ. भा. मराठी नाट्य परिषद, मुंबई
- म. फुले समता प्रतिष्ठान, पुणे
बाह्यदुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "आवर्त-Aavart by Prof. Datta Bhagat - Nirmal Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
- ^ "अश्मक-Ashmak by Prof. Datta Bhagat - Abhay Prakaashan - Nanded - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
- ^ "निवडक एकांकिका-Nivdak Ekankika by Prof. Datta Bhagat - Abhay Prakaashan - Nanded - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
- ^ "निळी वाटचाल-Nili Vatchal by Prof. Datta Bhagat - Pratima Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
- ^ "पिंपळपानांची सळसळ-Pimpalpananchi Salsal by Prof. Datta Bhagat - Swarup Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
- ^ "समकालीन साहित्य आणि साहित्यिक-Samakalin Sahitya Ani Sahityik by Prof. Datta Bhagat - Rajat Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
- ^ "Marathi Dalit Ekankika". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
- ^ "साहित्य समजून घेताना-Sahitya Samajun Ghetana by Prof. Datta Bhagat - Mira Books And Publication - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
- ^ "विजय तेंडूलकर (मराठी)-Vijay Tendulkar (Marathi) by Prof. Datta Bhagat - Sahitya Akademi - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-07-26 रोजी पाहिले.
- ^ "नागपूर | देशात कलाकारांची मुस्काटदाबी- दत्ता भगत". 24taas.com. 2017-11-26. 2020-07-26 रोजी पाहिले.