Jump to content

बेबी कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेबी कांबळे
जन्म इ.स. १९२९
वीरगाव, तालुका पुरंदर पुणे, महाराष्ट्र, भारत
मृत्यू २१ एप्रिल २०१२
फलटण
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार आत्मचरित्र

बेबी कांबळे (माहेरच्या काकडे) (जन्म : वीरगाव-पुरंदर, इ.स. १९२९; - फलटण, २१ एप्रिल २०१२) या दलित कार्यकर्त्या व लेखिका होत्या. त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव होता. मराठीमध्ये आत्मचरित्र लिहिणाऱ्या त्या पहिल्या दलित महिला आहेत.[][][]

बालपण

[संपादन]
         बेबीताईचा जन्म महाराष्ट्रातील पुरंदर तालुक्यातील वीरगाव येथे झाला. त्यांचे सारे बालपण आजोळी गेले. मुळात त्यांचे माहेरातील नाव बेबीताई पंढरीनाथ कांबळे असे होते. त्यांचे वडील हे ठेकेदार होते. त्यांचा स्वभाव अतिशय परोपकारी होता. बेबीताई यांच्यावर देखील वडिलांचा बराच अंशी प्रभाव होता. बेबीताई यांचे आजोबा ब्रिटिश अधिकाऱ्याकडे बटलर अर्थात स्वयंपाक घरातील प्रमुख सेवक म्हणून काम करत असत.

शिक्षण

[संपादन]
 वयाच्या आठव्या वर्षी बेबीताई वीरगावहून फलटणला शिक्षणासाठी आल्या. चौथीपर्यंतचे शिक्षण बाहुलीच्या शाळेत झाल्यावर त्यांनी मुधोजी विद्यालयातून पुढील शालेय शिक्षण घेतले.

कौटुंबिक माहिती

[संपादन]

वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कोंडिबा कांबळे यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी आपल्या मुलांनाही शिक्षण दिले.पुढे उदरनिर्वाहासाठी त्यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले होते. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार-प्रेरणेचे वारे अधिक प्रखरतेने वाहू लागले. याच काळात स्वतःही समाजासाठी काहीतरी योगदान द्यावे या विचाराने बेबीताई लिखाण करू लागल्या.

कारकीर्द

[संपादन]

पुरस्कार व सन्मान

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "बेबीताई कांबळे". Maharashtra Times. 2020-03-06 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ Rege, Sharmila (2006). Writing Caste, Writing Gender: Reading Dalit Women's Testimonios (इंग्रजी भाषेत). Zubaan. ISBN 978-81-89013-01-1.
  3. ^ Tharu, Susie J.; Lalita, Ke (1991). Women Writing in India: The twentieth century (इंग्रजी भाषेत). Feminist Press at CUNY. ISBN 978-1-55861-029-3.