भाऊ तोरसेकर
भाऊ तोरसेकर उर्फ गणेश वसंत तोरसेकर हे राजकीय विषयांवर वृत्तपत्रीय आणि दिवाळी अंकांतून लिखाण करणारे मराठी लेखक आहेत. माझा जागता पहारा या नावाचा त्यांचा एक ब्लाॅग आहे. तसेच त्यांचं ' प्रतिपक्ष ' नावाचे यूट्यूब चॅनेल आहे.[ संदर्भ हवा ]
२३ जून २०२१ रोजी भाऊंना माननीय राज्यपाल (महाराष्ट्र) भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला.[ संदर्भ हवा ]
वैयक्तिक आयुष्य
[संपादन]तोरसेकर हे एक आर्किटेक्चर ग्रॅज्युएट आहेत. भाऊ तोरसेकर यांनी १९६९ मध्ये आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठा येथून पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरुवात केली.[ संदर्भ हवा ]
साप्ताहिक भूपुत्र, ब्लिट्झ (मराठी), सकाळ (मुंबई) मधून पत्रकारीता केली. १९८५ ते १९८९ या काळात शिवसेनेचे मुखपत्र मार्मिक या साप्ताहिकातून कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर विवेक, चित्रलेखा यांसारख्या सप्ताहिकांमध्ये त्यांनी काम केले.[ संदर्भ हवा ]
१९९४ ते १९९७ च्या दरम्यान 'आपला वार्ताहर'चे मुख्य संपादक म्हणून काम पाहिले. भाऊ १९९८पासून स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करत आहेत. २०१०मध्ये 'पुण्यनगरी' दैनिकातून उलट तपासणी हे सदर चालवलं.[ संदर्भ हवा ]
भाऊंच्या 'जागता पहारा' या ब्लॉगवर ७५ लाखाहून अधिक वाचक आहेत.[ संदर्भ हवा ]
निवडक लेख
[संपादन]- दाखवायचे सुळे (सुप्रिया सुळे यांच्यावरील उपहासात्मक लेख)[ संदर्भ हवा ]
- दोन गुजराती (मोदी-शहा ह्या जोडगोळीवरचा लेख)[ संदर्भ हवा ]
पुस्तके
[संपादन]लोकप्रिय [ संदर्भ हवा ]
[संपादन]- कोरी पाटी
- मोदीच का?
- राहुल विरचित महाभारतातील उरफाटा घटोत्कच (राहुल गांधींवरील पुस्तक)
- पुन्हा मोदीच का?
- अर्धशतकातला अधांतर: इंदिरा ते मोदी
- कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट
- महाराष्ट्राचा महाजनादेश