Jump to content

चर्चा:अल बिरूनी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदलांनिश येथे समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) १०:५६, ८ ऑगस्ट २०१९ (IST)[reply]


भारतीय विद्यांचा अद्‌भुत जाणकार असलेला अल बरूनी (मृत्यू : इ.स. १०४८) हा गझनीच्या महंमदाबरोबर भारतात आलेला त्याचा एक कैदी होता. तो मुळात मध्य आशियातील खीवा साम्राज्यामध्ये (आजच्या उझबेकिस्तानचा एक भाग) एक मंत्री होता. जेव्हा इसवी सन १०१७मध्ये खीवाच्या बादशहाला महंमदाने पराजित करून बादशहाबरोबरच अल बरूनीला कैद केले, तेव्हा त्यांने या दोघांसह अनेकांना भारतात आणले होते.

अल बरूनीला संस्कृत, ग्रीक, पर्शियन, हिब्रू आणि ख्वारेझमियन (Khwarazmian) या भाषा येत होत्या.

अल बरूनी सुरुवातीपासूनच हिंदूंच्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करीत होता. भारतात आणल्यावरही त्याचा हा अभ्यास चालूच राहिला. एका बाजूला गझनीचा महंमद हिंदू संस्कृती नष्ट करीत चालला होता, तर दुसऱ्या बाजूला त्याच्यात सैन्याबरोबर असलेला अल बरूनी हा हिंदू संस्कृत साहित्याचे अध्ययन-मनन करीत होता. अध्ययनाबरोबरच त्याचे संस्कृत ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर करण्याचे उद्योग चालू होते.

अल बरूनीची मुख्य अडचण ही होती के तो भारतात हव्या त्या ठिकाणी हिंडून साहित्य गोळा शकत नव्हता की विद्वानांना भेटू शकत होता. फक्त गझनीच्या राज्यात (हे इराणपासून ते अफगाणिस्तान-पाकिस्तान पर्यंत होते) आणि भारतातील पंजाबमध्ये भ्रमण करणे अल बरूनीला जमू शकत होताॆ. पण त्याच्या सुदैवाने गझनीच्या साम्राज्यात बरेच हिंदू होते. त्यांच्याबरोबर चर्चांमधून त्याने भारताला येण्यापूर्वीच ब्रह्मसिद्धान्त, खंडखाद्यक, पंचतंत्र, चरक संहिता ह्या ग्रंथांचे अरबी अनुवाद वाचून तो मोकळा झाला होता. बाकीच्या बऱ्याचशा साहित्याचा अभ्यास त्याने भारतात आल्यावर केला. यांपैकी काहींची त्याने अरबी भाषांतरे केली., आणि अशा प्रकारे अरबी जगताला हिंदू संस्कृतीचा परिचय करून दिला.

अल बरूनीने कपिलमुनीचा सांख्य तत्त्वज्ञानावरील ग्रंथ, पतंजली सूत्र, पौलत्स्य सिद्धान्त, बृहत्‌संहिता आणि लघुजातकम् यांसारख्या ग्रंथांचे अरबी अनुवाद केले. त्यानंतर त्याने भारतीय गणित, हिंदू तत्त्वज्ञान अशी विविध विषयांवर एकूण २० पुस्तके लिहिली. पैकी सर्वात महत्त्वाचे पुस्तक म्हणजे, भारताचा ११व्या शतकातील आरसा म्हणता येईल असे तारीख-अल-हिंद ('अल बरूनीचा भारत') हे होय. ह्या असाधारण ग्रंथात अल बरूनीने भारतीय दर्शनग्रंथ, पुराणे, ज्योतिष ग्रंथ, रामायण, महाभारत यांखेरीज काही प्रसिद्ध युनानी पुस्तके यांमधलेही उतारे आहेत. हे उतारे भारतीय जीवनपद्धतीच्या विविध अंगांचा परिचय करून देतात. ईश्वर, आत्मा यांबद्दलच्या हिंदू कल्पनांपासून ते जाती, वर्ण यांपर्यंत आणि खगोलशास्त्रापासून ते भारतीय कालगणनेपर्यंतची माहिती अल बरूनीच्या या ग्रंथात आली आहे. ग्रंथात त्याने जागोजागी भारतातील विद्वानांच्या गणितशास्त्राच्या, खगोलशास्त्राच्या आणि दर्शनशास्त्राच्या ज्ञानाची त्याने तोंड फाटेस्तोवर स्तुती केली आहे.

अल बरूनीने काही ठिकाणी तत्कालीन भारतीयांना नावेही ठेवली आहेत. त्याच्या लिहिण्यानुसार हे भारतीय स्वत:कडचे ज्ञान कुजवतील, पण परदेशी लोकांना नाहीच नाही, पण स्वत:च्या देशातील जातीबाहेरच्या लोकांनाही देत नाहीत. मात्र या तत्कालीन भारतीयांचे पूर्वज असे संकुचित मनोवृत्तीचे नव्हते, असेही त्याने नमूद केले आहे.

इसवी सनाच्या १०३० या वर्षी अल बरूनीने त्याचे भारतावरील पुस्तक 'तारीख-अल-हिंद' पुरे केले. तोपर्यंत गझनीचा महंमद मरण पावला होता. त्यानंतर १८ वर्षांनी, १०४८ साली भारतीय विद्येचा हा महान जाणकार, अल बरूनीही निधन पावला.