हरिश्चंद्र बोरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


डॉ. हरिश्चंद्र बोरकर
जन्म ११ ऑक्टोबर १९४४
रेंगेपार (कोहळी), पो. पिंपळगाव, ता. लखनी, जि. भंडारा, महाराष्ट्र ४४१८०४
शिक्षण एम.ए (मराठी), एम.एड, पीएचडी. (भाषाशास्त्र)

डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर (जन्म : ११ आॅक्टोबर १९४४) हे एक मराठी कोशकार आहेत. ते एम.ए.पीएच.डी आहेत. 'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' हा त्यांच्या पी.एच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता.[१] कोशांव्यतिरिक्त काही अन्य पुस्तकेही त्यांनी लिहिली असली तरी झाडीबोली भाषेचा कोश आणि मराठी अंत्याक्षरी कोश ह्या दोन कोशांमुळे हरिश्चंद्र बोरकर प्रकर्षाने ओळखले जातात. हरिश्चंद्र बोरकरांचे २०१८ सालापर्यंत १३ कवितासंग्रह, १४ कादंबऱ्या/कथासंग्रह, १६ नाटके, २ प्रवासवर्णने, १४ समीक्षा ग्रंथ आणि तीन शब्दकोश प्रकाशित झाले आहेत.[१] Archived 2018-10-08 at the Wayback Machine.

'दंडार', 'खडीगंमत' या लोककलांचे त्यांनी पुनरुज्जीवन केले आहे.

डाॅ. हरिश्चंद्र बोरकर यांची पुस्तके[संपादन]

  • कविता झाडीची (झाडीबोलीतील २५ उत्कृष्ट कवितांचा संग्रह, सहसंपादक - ना.गो. थुटे -२००२)
  • कानात सांग (कवितासंग्रह, २००२)
  • कोहळी
  • झाडीपट्टीची लोकरंगभूमी
  • झाडीबोली भाषा आणि अभ्यास
  • झाडीबोली मराठी शब्दकोश (इ.स. २०००)
  • भाषिक भ्रमंती
  • मराठी अंत्याक्षरी कोश (२००९)
  • श्रीमुकुंदराजकृत विवेकसिंधूची ओळख
  • संख्यादर्शक शब्दकोश (२००१)

डाॅ. हरिश्चंद्र बोरकर यांना मिळाले सन्मान व पुरस्कार[संपादन]

  • नागपूरच्या अंभोरा देवस्थानचा मुकुंदराज पुरस्कार
  • नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार (१९९९)
  • महाराष्ट्र सरकारचा भाषाशास्त्र पुरस्कार (१९९९)
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा भाषा पुरस्कार (२०००)
  • महाराष्ट्र सरकारचा २०१८चा मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार (२०१९)

संदर्भ व नोंदी[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]

  1. ^ "काही अधोरेखिते..." Maharashtra Times. 2019-01-03 रोजी पाहिले.