चर्चा:दांडिया रास

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:साद।माहितगार सदर लेख स्वतंंत्र असावा असे वाटत नाही.कारण दांंडिया आणि गुजरात हे समीकरणच आहे.ते तेथील सांंस्कृृतिक वैभव आहे तसेच दांंडिया शारदीय नवरात्रातच प्रामुख्याने खेळला जातो.सदर लेखातील मजकूर मी शारदीय नवरात्र लेखात घातला आहे.हे मत योग्य वाटल्यास आपण हा लेख रद्द करू शकू.आर्या जोशी (चर्चा)

@आर्या जोशी:,
दांडिया हा गुजरातमधील एक लोकनृत्यप्रकार आहे. हे जरी शारदीय नवरात्रात प्रामुख्याने होत असले तरीही गुजरातमधील (विशेषतः ग्रामीण भागात) कोणत्याही मंगलप्रसंगी गरबा व दांडिया खेळण्याचा प्रघात आहे. गरबा हे देवीशी (अंबाबाई) निगडीत आहे तर दांडिया नृत्य हे कृष्ण व गोपिकांशी निगडीत आहे.
असे असता हा लेख शारदीय नवरात्रात न घालता वेगळा असावा असे वाटते. अर्थात शारदीय नवरात्र लेखात दांडियाचा उल्लेख गरजेचा आहेच.
अभय नातू (चर्चा) २०:५१, ९ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]