विकिपीडिया चर्चा:महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान २०१८

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येथे चित्र नको असल्यास कृपया काढावे.--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:५३, १९ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

नसलेले लेख हे लाल दुव्यात नको असे वाटते. मी दुवे काढले आहेत. लाल दुव्यावर चुकीचे शीर्षक असेल तर तसाच लेख तयार होईल. काळजीपूर्वक शोध घेवून नवे लेख तयार केले जावेत.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२२, २२ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

साईट नोटीस[संपादन]

@V.narsikar:, अभियानाच्या नियोजनात संपादकांना व वाचकांना सामील करण्यासाठी लवकर साईट नोटीस झळकवायला हवी असे वाटते.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२२, २२ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

@V.narsikar आणि Tiven2240:, आता अभियानाची नोटीस मोठी करावी. दुसरी नोटीस बरेच दिवस आहे. तसेही अभियान आपल्या विकिसाठी महत्वाचे आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:१३, २७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

नोटीस मोठी करावी म्हणजे नेमके काय हे समजले नाही. मजकूर वाढवावा कि आकार वाढवावा? आकार वाढवला तर ते बेढब दिसेल. तसेच नेहमीच्या सदस्यांना ते पान लोड होतांना वेळ लागेल. 'साचा:साईट नोटीस महिला स्वास्थ्य अभियान' याचे चर्चापानावर नेमका काय मजकूर हवा ते सांगावे म्हणजे आवश्यक ते बदल करता येतील.येथे खूप जास्त मजकूर नको असे माझे मत आहे. त्यात फक्त एक दुवा असला तर त्याने मुख्य पानावर जाता येते.तितकेच पुरे आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) १५:५५, २७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
अक्षर आकार वाढवावा असे वाटते. तसेच मोबाईलवर ही नोटीस दिसत नाही. वरची नोटीस दिसते. ही नोटीस वर घेतल्यास प्रश्न सुटेल बहुधा. मजकूर नोटीस चर्चा पानावर लिहिला आहे.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:२५, २७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

सुबोध जी साईट नोटीस ही कुठल्याही विकिपीडियावर मोबाईल दृष्यात दिसत नाही. जर इतर विकिपीडियावर ती दिसत आहे तर सांगा आवश्यक बदल करता येईल. जी आपण पाहत आहे ती सेंट्रल नोटीस आहे जी प्रतिपालक/मेटा प्रचालकांनद्वारे पटवली आहे ती मोबाईल दृष्यात दिसते --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:३७, २७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

लेख यादी, रचना[संपादन]

कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ विधेयक (२०१२)- अपूर्ण लेख. या लेखात "विशाखा मार्गदर्शक तत्त्वे" लेखातील मजकूर टाकून, विस्तार व विकीकरण करून एकच पूर्ण लेख करावा का? मी सध्या माझ्या सूचना "विस्तार / विकीकरण आवश्यक असलेले लेख" येथेच टाकत आहे. तसेच निरनिराळ्या प्रकारचे लेख कोणत्या मुद्द्यांच्या आधारे लिहावे यासंबंधीची एक सारिणी मी इथे समाविष्ट करू की मुख्य पानावर? --राजेंद्र प्रभुणे (चर्चा) १५:१३, २३ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

@Rajendra prabhune:, आपण मुलभूत काम करत आहात. अशी रचना येथेच उपलब्ध केल्यास लेखांना शिस्त येईल असे वाटते. सारणी कशी वाचावी याचेविषयी थोडे मार्गदर्शक तपशील लिहिले तर बरे होईल. लगेच पाहिले की गोंधळात पडल्यासारखे होते. एका लेखाचे उदाहरण दिल्यास स्पष्टता येईल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:१३, २७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी:, आपण म्हटल्याप्रमाणे उदाहरण देऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. पण विस्तृत स्पष्टीकरणाची या पानावर आवश्यकता आहे का? इतरत्र (उदा. - विकी धोरणे / विकिपीडिया:शैली मार्गदर्शक) आवश्यकता असल्यास हा मजकूर तिथे हलवावा का?

--राजेंद्र प्रभुणे (चर्चा) १५:१५, २८ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

@आर्या जोशी: मी या पानात काही बदल केले आहेत. कृपया तपासा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १६:४१, २५ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

लोगो चांगले आहेत. या अभियानाचे राष्ट्रीय संयोजन एक गट करत आहे. त्यांनी एखादा अधिकृत लोगो उपलब्ध केल्यास हा बदलता येईल.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:१३, २७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]


नवीन लोगो[संपादन]

@Tiven2240: नमस्कार ! राष्ट्रीय संयोजन समितीकडून महिला स्वास्थ्य अभियानासाठी नवा लोगो काल तयार झाला आहे. तो येथे घ्यावा. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) ०६:३८, १ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

Wiki Women for Women Wellbeing logo without text
@आर्या जोशी: झाले.--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:५०, १ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

@Tiven2240: धन्यवाद  ! आर्या जोशी (चर्चा) १३:१३, १ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

Very important initiative[संपादन]

I must congratulate Dr. Prabhune and others who has taken up this initiative. Thanks a lot. I am not sure how much I will be able to contribute, but I will surely work on it as per my capacity and available time. Thank you. -- डॉ. अभिजीत सफई १३:५०, २१ जानेवारी २०१९ (IST)[reply]