Jump to content

नामदेव चंद्रभान कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नामदेव चं. कांबळे
जन्म नाव नामदेव चंद्रभान कांबळे
टोपणनाव ना.चं.
जन्म १ जानेवारी १९४८
शिरपूर ता. मालेगाव जि. वाशीम
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र शिक्षक,साहित्यकार, पत्रकार,
राजकरण, आकाशवाणी, समाजसेवक.
वडील चंद्रभान कांबळे
आई भुलाबाई कांबळे
पत्नी आशा कांबळे
पुरस्कार साहित्य अकादमी[]

नामदेव चंद्रभान कांबळे (जन्म : शिरपूर-वाशीम, १ जानेवारी १९४८[] - ) हे मराठी लेखक, पत्रकारशिक्षक आहेत. त्यांना राघव वेळ या कादंबरीसाठी इ.स. १९९५मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[]

विदर्भातील वाशीमच्या चपराशीपुऱ्यात राहणाऱ्या कांबळे यांच्या झोपडीला कुडाच्या भिंती होत्या. वीज किंवा नळ नव्हते. येथेच त्यांना अकादमी पुरस्कार मिळाला आणि २५ वर्षांनी पद्मश्री.

नामदेव कांबळे यांच्या आठ कादंबऱ्या, चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह आणि दोन ललित संग्रहांखेरीज चरित्र, वैचारिक ग्रंथ अशी त्यांची एकवीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाय अन्य पुस्तकांची अनेक हस्तलिखिते त्यांच्याजवळ आहेत.

कांबळे यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अकल्पित (कविता संग्रह)
  • अस्पर्श (कादंबरी)
  • आपले दादा- दादासाहेब हावरे (चरित्र)
  • ऊन सावली (कादंबरी) - राघववेळचा विस्तार
  • कृष्णार्पण (कादंबरी)
  • गहिवर (कविता संग्रह)
  • गांधी उद्यासाठी (वैचारिक)(+सहलेखक)
  • झाकोळ (कादंबरी)
  • तो:ती:अन्वयार्थ (कविता संग्रह)
  • परतीबंद (कथा संग्रह)
  • प्रत्यय (कविता संग्रह)
  • बळी (कथासंग्रह)
  • महात्मा गांधी आणि डाॅ.आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय (वैचारिक)[]
  • मोराचे पाय (कादंबरी)
  • राघव वेळ (कादंबरी)
  • शब्दांच्या गावा जावे (भाषणे)
  • समरसता साहित्य- स्वरूप व समिक्षा(समिक्षा)
  • सांजरंग (कादंबरी)
  • सेलझाडा (कादंबरी)
  • सिद्धार्थ (ललित-लेख)
  • स्मरण विस्मरण (लेख संग्रह)

पुरस्कार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

शेतमजुराचा मुलगा ते पद्मश्री, वाचा नामदेव कांबळे यांचा थक्क करणारा प्रवास

संदर्भसूची

[संपादन]
  1. ^ a b "साहित्य अकादमी पुरस्कार यादी". २० एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ http://www.loksatta.com/navneet-news/sun-saw-history-in-today-kutuhal-war-and-peace-navneet-34830/lite/
  3. ^ "सामाजिक कळकळीचा विचारसंवाद". Maharashtra Times. 2021-02-05 रोजी पाहिले.
  4. ^ "Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2021-01-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-26 रोजी पाहिले.
  5. ^ author/lokmat-news-network (2021-01-25). "साहित्यिक नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार!". Lokmat. 2021-11-11 रोजी पाहिले.