चर्चा:जॉन वियानी
Appearance
@Sureshkhole: हे लेख मशिन ट्रांसलेशन आहे याची माहिती आपल्याला कुठून भेटले? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:१६, ५ ऑगस्ट २०१८ (IST)
@Tiven2240: @अभय नातू: @V.narsikar:
- टायवीन आपण जे काही मराठी विकिवर लिहिता ते सर्वच यांत्रिक भाषांतरातून येते. अगदी हा वर विचारलेला प्रश्नसुद्धा आपण तसाच विचारलेला आहे. ह्या दुव्यावर मी आपण विचारलेला प्रश्न पुऩ्हा उलटा टाकला असता त्या चुकीच्या मराठी वाक्याचे बरोबर इंग्रजी वाक्य येते. हेच मी प्रत्येक लेखानिशी आणि आपल्या प्रत्येक लिहिलेल्या वाक्यानिशी दाखवून देऊ शकतो. मी योग्यत्या वेळी आणखीन अनेक गोष्टी आहेतच त्या ही येतीलच.
- यांत्रिक भाषांतर हे जुन्या भाषांतराची आठवण ठेऊन नवीन भाषांतर करते त्यामुळे त्यामध्ये काही विशिष्ट चुका राहातात. त्या आम्हांला दिसतात.WikiSuresh (चर्चा) १०:१३, ६ ऑगस्ट २०१८ (IST)
- @Sureshkhole: माझ्याकडे आपल्याला बोलण्यास काहीही शब्द नाही. नक्की आपल्याला विकी सुट्टीची गरज आहे. Google Translate हे गूगल द्वारे बनवलेले वेबसाईट आहे. नक्की माझी मराठी ते योग्य पणे ते आपल्याला इंग्लिश/मराठीत भाषांतर करून देणार कारण मी मूळ मराठी भाषेतला व्यक्ती नाही. मी आपल्याला तेस विचारले ना की आपल्याला याची माहिती कुठून भेटली की हा पान मशीन द्वारे भाषांतर केले आहे. नक्की मशीन भाषांतर मध्ये चुका असतात. परंतु आपण स्पष्टपणे बोलू शकत नाही की हे पान मशीन भाषांतर आहे. आपल्याला त्यातील फरक दाखविण्यासाठी मी आपल्या या लेखाचे मशीन भाषांतर करून दाखवत आहे. हे पहा आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की यांत्रिक भाषांतर काय आहे. कृपया असे लेखात आवश्यक बदल करा. जर आपल्यास त्याचे माहिती नाही तर आपण {{विस्तार}}/{{बदल}} साचे वापरा. आपले एक प्रचालक यांनी सुद्धा गूगलचे हे वेबसाईटवर आपले विशेष योगदान दिले आहेत. चुकीचा साचा लावणे बंद करा. जर असेस आपल्याला साचे (मट्रा) लावायचे आहे तर कृपया त्याचे धोरण सुद्धा वाचा. आपण त्याचे धोरणांचे पालन न करता त्याचे उल्लंधन करत आहे. विकिपीडिया कसे चालते. साचे कुठे लावतात याची माहिती वरिष्ठ प्रचालकांनपासून ग्यावे. विकिपीडिया कशी चालते ये जाणून घ्या. असे प्रत्येक वेळी एडिट समरी मध्ये प्रतिपालकांनी लक्ष द्यावे असे लिहून चालत नाही. खरं तर आपले समरी मधील मट्रा, मजकूर सुधारला न गेल्यास एक महिन्यात पान काढण्यात यावे. असे लिहून आपण स्वतःचे धोरण जाहीर करत आहे. परंतु मला अजून समजले नाही की प्रतिपालक लक्ष घेतील? विकिपीडियावर अनेक कामे आहेत शिवाय आपले गैरसमज दूर करण्यास. पुन्हा एकदा आपण काय करत आहेत ते आपल्याला माहिती नाही. ही व्यक्तीतगत हल्ला नाही तर आपले पुनरावलोकन आहे नाहीतर आपण आता विकिमीडिया स्टाफ ला लक्ष घेण्यास आपले समरी मध्ये लिहून टाकणार. मी नेमकी आपल्यास सद्भावना गृहीत धरत आहे परंतु आपण काय करत आहे ते आपल्याला सुद्धा खबर नाही. असो त्यात मी तर आपले मदत करू शकत नाही कारण आपण फक्त माझ्यात एक एक तूट काढत आहे जसे आपण इतर सदस्य मध्ये काढतात. फक्त आशा आहे आपण जसे पूर्वी संपादन करत होते तसे पुन्हा कराल. अभय जसे म्हणतात की आपण खूप चांगले काम करतात तसे काम चालू ठेवा. नक्की मराठी प्रतिपालक म्हणून आम्ही आपल्या पाहू अशी आशा. मनात घेऊ नये फक्त एक संपादक म्हणून आपल्याला या संपादक पासून ही सल्ला आहे. धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:१३, ६ ऑगस्ट २०१८ (IST)
- यांत्रिक भाषांतर ओळखणे गेली अनेक वर्षे भाषांतर करणाऱ्या व्यक्तींसाठी काहीही कठीण नाही. मी व्यवसायाने अनुवादक आणि संशोधक म्हणूनच काम करतो. त्यामुळे मला वाक्यरचनेतल्या आणि शब्दांच्या निवडीतल्या यांत्रिक भाषांतराच्या चुका उघड दिसतात. अनेक शब्द जे आता सामान्य मराठीत वापरातही नाहीत ते शब्द आपल्यासारख्या अ-मराठी व्यक्तिने वारल्यास लक्ष आपोआपच वेधले जाते.
- गुगलचे उपकरण वापरले असेल किंवा आणखीन काहीही, यांत्रिक भाषांतर हा घोळ आहेच. धोरण मी ठरवलेले नाही ते आधिच होते.
- मी साचा चुकीचा लावलेला आहे किंवा नाही याची शहानिशा इतर प्रचालकांनी आणि अनुभवी सदस्यांनी करावी अशी मी @अभय नातू:@V.narsikar:@आर्या जोशी:@सुबोध कुलकर्णी: खासकरून अनुवादक आणि भाषेवरील इतर कामे करणाऱ्या @ज्ञानदा गद्रे-फडके: यांनी या व टायवीन यांच्या इतर लेखांवर नजर टाकावी व ते लेख यांत्रिकरित्या भाषांतरीत आहेत की नाही याचा न्याय निवाडा करावा. अशी मी त्यांना विनंती करीत आहे. (दोन व्यक्तींच्या वादात तिसऱ्या व्यक्तिचा सहभाग करुन आणि त्या विषयातील तज्ञांचे मत घेतले जाते हा साधा विकिचा संकेत आपल्याला मान्य नाही हे ही वरील उद्दामपणामधून(सभ्यता ठेवणे टायवीन यांच्या अर्धकच्च्या आणि आततायी वागणूकीने अवघड केलेले आहे) दिसून येते.)
- हा माझ्यावर शुध्द वैयक्तिक हल्लाच नाही तर टायवीन यांना मराठी न समजल्याचा बक्कळ पुरावा आणि प्रचालक पदाचा पूर्ण गैरवापर आहे हे ही मी नोंदवत आहे. प्रत्येक वेळी मला विकिसुट्टी घेण्याची गरज सांगत, अवरुद्ध करण्याच्या/कारवाईच्या धमक्या देणे आपल्या बाबतीत नेहमीचे झालेले आहे.
- प्रतिपालकांना आणि इतर प्रचालकांना ठरवूदेत की, त्यांनी कुठे लक्ष द्यावे, आपल्याला त्याची चिंता कश्याला?
- आपल्या मला आलेल्या एकाही सादामधून आपण माझ्याप्रति सद्बावना गृहीत धरली आहे असे दिसत नाही. सद्भावना गृहीत धरण्याचा मंत्र घोकण्यापेक्षा तो प्रत्यक्षात आणलात तर खूप बरे होईल. WikiSuresh (चर्चा) ११:१९, ७ ऑगस्ट २०१८ (IST)