जॉन शेफर्ड-बॅरन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरन (२५ जून, १९२५:शिलॉंग, आसाम प्रांत, ब्रिटिश भारत - १५ मे, २०१०:इन्व्हरनेस, स्कॉटलंड) हे ब्रिटिश अभियंता आणि शोधक होते. त्यांच्या नेतृत्वाखालील अभियंत्यांनी एटीएम मशीनचा शोध लावला.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरन यांचा जन्म २५ जून १९२५ रोजी भारतातील शिलॉंग येथे झाला. त्यांचे वडील स्कॉटीश होते. त्यांचे नाव विल्फ्रीड बॅरन होते. जॉन यांचा जन्माचा वेळी ते चिटगाव पोर्टचे मुख्य इंजिनीअर होते. त्यांची आई डोरोथी, ऑलिंपिक टेनिस खेळाडू होती आणि विंबल्डन महिला टेनिस दुहेरीची विजेती होती.