Jump to content

शिरगाव तर्फे सातपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिरगाव तर्फे सातपाटी हे गाव भारतात महाराष्ट्र राज्यात पालघर जिल्ह्यात पालघर तालुक्यात आहे. हे ठिकाण महिकावतीच्या उत्तर दिशेला लागून आहे.

  ?शिरगाव तर्फे सातपाटी

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
लोकसंख्या ५,८४४ (२०११)
भाषा मराठी
सरपंच चिन्मयी मोरे
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०५
• +०२५२५
• एमएच४८

एका आख्यायिकेनुसार हनुमानाने महिकावती गावात जेव्हा रामलक्ष्मणांना वाचविण्यासाठी मही राक्षसाचा वध केला तेव्हा मही राक्षसाचे शीर धडावेगळे करून उत्तर दिशेला फेकले ते ह्या गावात पडले आणि ह्या गावाचे नाव शिरगाव पडले.

इतिहास

[संपादन]

हे गाव महिकावती ह्या बिंब राजाच्या नगरीचा भाग होते आणि कालांतराने ते विभक्त होऊन लोकसंख्येनुसार शिरगाव ग्रामपंचायतीच्या अंमलाखाली आले.

भूगोल

[संपादन]

गावाच्या दक्षिणेला माहीम केळवे गाव तर उत्तरेला सातपाटी गाव आहे. गावाच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. समुद्र किनाऱ्याला लागूनच एक पुरातन भुईकोट किल्ला आहे.बाजूलाच प्राथमिक शाळा आहे.

हवामान

[संपादन]

उन्हाळ्यात येथील हवामान उष्ण, दमट असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान उष्ण असते. हिवाळ्यात हवामान सुखद थंड असते.

वाहतूक व्यवस्था

[संपादन]

येथे येण्यासाठी पालघरवरून शिरगाव किंवा सातपाटी एसटी बसेस उपलब्ध आहेत. रिक्षाने सुद्धा पालघरहून येथे येता येते. सातपाटीवरून एडवण उसरणीला रिक्षाने माहीम दांडा मार्गाने जाता येते.

नागरी सुविधा

[संपादन]

ग्रामपंचायततर्फे सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा,सार्वजनिक दिवाबत्ती, पावसाळ्याचे पाणी निचरा होण्यासाठी गटारबांधणी,इत्यादी कामे केली जातात.

लोकजीवन

[संपादन]

येथील लोक मुख्यतः शेती बागायती व मासेमारी व्यवसाय करतात.बागायतीत केळी,सुपारी,पानवेल, नारळ, तसेच पडवळ, गिलका,दुधी, कारले,इत्यादी फळभाज्या व आळू,माठ,देठ,पालक,इत्यादी पालेभाज्या अशी पिके घेतली जातात.

लोक मेहनती, कष्टाळू, जिद्दी, काटक,प्रामाणिक समाधानी व धार्मिक प्रवृत्तीचे आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]

शिरगाव किल्ला

संदर्भ

[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

बाह्य दुवे

[संपादन]