Jump to content

दिलीप कोल्हटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिलीप कोल्हटकर ( सांगली, ३ सप्टेंबर १९४६; मृत्यू: पुणे, ४ मे २०१८) हे मराठीतले एक नाट्य-चित्र दिग्दर्शक, अभिनेते आणि प्रकाशसंयोजक होते. त्यांनी ३० वर्षे बँक आॅफ बडोदामध्ये नोकरी केली होती. आंतर-बँक नाट्यस्पर्धा, एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी, राज्य नाट्यस्पर्धा व व्यावसायिक रंगभूमी अशा सर्वच नाट्य सादरीकरणात त्यांची भरघोस कामगिरी होती. 'मोरूची मावशी' या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे दोन हजाराहून अधिक, तर भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'आई रिटायर होतेय' या नाटकाचे ९५० प्रयोग झाले होते. दिलीप कोल्हटकरांनी राज्य नाट्यस्पर्धेत ‘ययाति’ हे सहा तासांचे, पाच अंकी नाटक सादर केले होते, त्यातील पाचही अंक वेगवेगळ्या नाटककारांनी लिहिले होते.

दिलीप कोल्हटकरांनी विजया मेहता यांच्या 'जास्वंद' या नाटकात बोक्याची आणि ‘शाकुंतल’मध्ये विदूषकाची भूमिका केली होती.

कोल्हटकर मुंबईत बरीच वर्षे होते. २००२ साली ते पुण्यात कर्वेनगर भागात रहावयास आले. त्यांच्या ६५ वर्षांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांची फेब्रुवारी २०१८मध्ये कुणीतरी हत्या करून त्यांच्या घराला आग लावली होती.

दिग्दर्शित नाटके

[संपादन]
  • आई रिटायर होतेय
  • आसू आणि हसू
  • गोड गुलाबी
  • गोष्ट जन्मांतरीची
  • चिरंजीव आईस
  • छावा
  • कवडीचुंबक
  • दीपस्तंभ'
  • पार्टी (भूमिका आणि दिग्दर्शन)
  • बिघडले स्वर्गाचे दार
  • मोरूची मावशी
  • ययाति
  • राजाचा खेळ
  • षड्ज
  • सप्तपुत्तुलिका
  • सोनचाफा

दिग्दर्शित चित्रपट

[संपादन]
  • ताईच्या बांगड्या
  • शेजारी शेजारी

मिळालेले पुरस्कार

[संपादन]
  • बारावेळा नाट्यदर्पण पुरस्कार
  • चारवेळा महाराष्ट्र राज्य व्यावसायिक मराठी नाट्यस्पर्धेचे पुरस्कार

संदर्भ

[संपादन]