Jump to content

चर्चा:मयूरासन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करुन या लेखात समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) २०:४५, ५ एप्रिल २०१८ (IST)[reply]


पर्शियन भाषेत मोराला 'ताऊस' (طاووس) असे म्हणतात. त्यामुळे ह्याला तख़्त-ए-ताऊस (मयूर सिंहासन) असेही एक नाव होते. मुगल बादशहा शहाजहानने हे प्रसिद्ध सिंहासन तयार करून घेतले. १२ मार्च १६३५ रोजी पहिल्यांदा शहाजहान ह्या सिंहासनावर बसला. पहिल्यांदा हे सिंहासन आग्ऱ्याच्या किल्यात होते. नंतर ते दिल्लीच्या लाल किल्यात आणले गेले. ह्या सिंहासनासाठी ११५० किलो सोने आणि २३० किलो वेगवेगळी बहुमूल्य रत्ने वापरून हे सिंहासन तयार केले गेले. बेदख़ल ख़ाँ ह्या कारागिराच्या नेतृत्वाखाली हे सिंहासन बनविण्याचं काम सात वर्ष चालले.

   भरीव सोन्याचा वापर करून हे सिंहासन बनविले गेले. सिंहासनावर समोरून दोन अत्यंत आकर्षक सोन्याचे मोर आपला पिसारा फुलवून उभे होते. या मोरांच्या पंखांत अत्यंत दुर्मिळ अशी विविध प्रकारची रत्ने वापरली गेली होती. त्यामुळे प्रकाशात ह्या मोरांचे तेज डोळे दिपवून टाकेल असे लखलखते दिसायचे. ह्या सिंहासनाच्यासाठी अहवा, अबरी, अमलीया,  उपल, कर्पिशमणि, गोमेद, गौरी, चकमक, मूवेनजफ, पारस, पुखराज, मरगज, स्फटिक, सूर्यकान्त, हरितमणि, संगसितारा, लास, पन्ना, माणिक्य, नीलम,  हजरते बेर अशी विविध प्रकारची रत्ने वापरली गेली.

फोटो

[संपादन]

तख़्त-ए-ताऊस (मयूर सिंहासन)