मयूरासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


मयूरासन किंवा मयूर सिंहासन (फारसी:تخت طاووس; तख्त-ए तावुस) हे मुघल सम्राटांचे सिंहासन होते. शाहजहानने तयार करविलेल्या या आसनात मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक व इतर अनेक मौल्यवान जवाहिरे वापरलेली होती. मुघल दरबाराच्या दिवाण ए खासमध्ये असलेले हे आसन दोन तेव्हाच्या कोटी रुपये किंमतीच्या सामानातून तयार केले गेले होते.

१७३९मध्ये नादिरशाहने दिल्लीवर आक्रमण करुन दिल्ली बेचिराख केली. त्यावेळी त्याने कोहिनूर, दर्या ए नूर हे हिरे व इतर अमाप संपत्तीबरोबर मयूरासनही लुटून नेले. इराणमध्ये नेल्यावर या सिंहासनाचा माग लागत नाही.