सिरसगाव मंडप
स्थान
[संपादन]सिरसगाव मंडप हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन या तालुक्यात आहे. हे गाव भोकरदन - हसनाबाद रस्त्यावर सिरसगाव पाटी पासून 2 km अंतरावर वसलेले आहे. औरंगाबाद व "जालना येथे जवळचे रेल्वे स्थानक आहे.
लोकजीवन
[संपादन]गावात प्रामुख्याने हिंदू,बौद्ध, मुस्लिम धर्मीय आहेत. गावातील 80 टक्के लोकसंख्या ही मराठा कुणबी जातीची आहे.बहुतांश लोकसंख्या सहाने हे आडनाव असलेली आहे.
प्रशासन
[संपादन]इथला कारभार हा ग्रामपंचायतीमार्फत चालतो.गावचे सरपंच सुरज पाटील सहाणे हे आहेत. हे गाव भोकरदन पोलीस स्टेशनाच्या हद्दीत येते. तहसील कार्यालय भोकरदन येथे आहे.
शिक्षण
[संपादन]गावात जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा व शिवशंकर माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.
आरोग्य
[संपादन]गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे,हसनाबाद आरोग्य केंद्र अंतर्गत. तसेच खाजगी इस्पितळही आहे.
व्यवसाय
[संपादन]येथील जनजीवन हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. काही लोक इतर व्यवसाय करतात. येथे जालना जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक या बँका भोकरदन येथे आहेत.