रंगभूमी दिन (महाराष्ट्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र शासनाने रंगभूमी दिन हा ५ नोव्हेंबर रोजी विष्णूदास भावे जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.[१]


मराठी रंगभूमीचा परिप्रेक्ष हा किर्तन ,भारुड,दंडार, दशावतार ,पोवाडा, लळीत, भागवतमेळे ,नटवे ,बहुरूपी लोकनाट्य ,तमाशे आदी लोकपरंपरा स्त्रोतातून झालेला आहे. लोकरंगभूमी हीच खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीची जननी आहे. क्रमाने विकसित झालेल्या रंगभूमीच्या प्रत्येक विकास टप्प्या मागे लोकरंगभूमीचे स्थान महत्त्वाचे ठरलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर नाट्य वाङमयाचा विचार करत असताना महाराष्ट्राला फार आदिम अशी लोककलावंतांची परंपरा आहे.त्यातूनच लोकरंगभूमी विकसित झाली.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ जाधवर, देवा (२०१९). चालु घडामोडी (५० वी आवृत्ती). पुणे: युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन प्रा. लि. pp. १२८.